टेस्ला अमेरिकेत कार बनवून हिंदुस्थानात विकणार, कंपनी मुंबईसह फक्त 2 शोरूम उघडणार

टेस्ला अमेरिकेत कार बनवून हिंदुस्थानात विकणार, कंपनी मुंबईसह फक्त 2 शोरूम उघडणार

अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कारची गेल्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्ला कंपनी हिंदुस्थानात कार बनवणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता टेस्ला हिंदुस्थानात कार बनवणार नसून अमेरिकेत बनवलेली कार हिंदुस्थानात विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. टेस्ला कंपनी हिंदुस्थानात केवळ दोन शोरूम उघडणार आहे. एक शोरूम मुंबईतील बीकेसी येथे असणार आहे. तर दुसरे शोरूम दिल्ली किंवा बंगळुरू येथे असेल. केंद्रातील मोदी सरकारने टेस्लासाठी पायघड्या घातल्या आहेत.

सरकारने आयात शुल्क 70 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. तरीसुद्धा टेस्ला कंपनीला हिंदुस्थानात कार बनवण्यात रस नाही. केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये ‘स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक पॅसेंजर कार्स इन इंडिया’ या ईव्ही धोरणाला मान्यता दिली. ईव्ही धोरणाच्या नियमांनुसार, कंपन्यांना किमान 4 हजार 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. कंपन्यांना तीन वर्षांच्या आत हिंदुस्थानात ईव्हीचे उत्पादन आणि व्यावसायिक उत्पादन सुरू करावे लागेल. ऑटो कंपन्यांना 3 वर्षांच्या आत प्लांट उभारावे लागतील आणि इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करावे लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;