मिठीचा गाळ मुंब्रा, दिव्यात टाकल्यास उद्रेक होईल; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मिठीचा गाळ मुंब्रा, दिव्यात टाकल्यास उद्रेक होईल; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा आणि दिव्यात छुप्या पद्धतीने सुरू झालेल्या बेकायदा डम्पिंगच्या दुर्गंधीने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. असे असताना मुंबईच्या मिठी नदीतून निघणारा गाळ मुंब्या, दिव्यात टाकण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेण्यात आला आहे. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडाडून विरोध केला आहे. मिठीचा गाळ मुंब्रा, दिव्यात टाकला तर उद्रेक होईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.

मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. गाळ बाजूला काढल्यानंतर तो पूर्णपणे सुकला की त्याची नोंद करून डंपरद्वारे महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने महापे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे डंपरचालक गाळ नेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात मिठीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गाळ पडून आहे. मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यास हाही गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याची तत्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने प्रशासनाने ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा किंवा दिवा येथे जागेची निवड केली आहे. याला विरोध करीत शिवसेना दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देत हरकत घेतली आहे.

अधिकारी संभ्रमावस्थेत
मिठी नदीच्या गाळामुळे मुंब्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. हा गाळ नेमका कुठे टाकणार याबाबत ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे अधिकारीदेखील संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मिठी नदीच्या गाळावरून ठाण्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांच्या भावनांचा विचार करून येथे गाळ टाकू नका
दिवा शहरात अगोदरच छुप्या पद्धतीने अनधिकृत डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात मुंबईतील मिठी नदीचा गाळ येथे टाकल्यास दिवा शहरातील नागरिकांच्या रागाचा उद्रेक होईल. तरी प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांच्या भावनांचा विचार करून हा गाळ येथे टाकू नका, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;