एलॉन मस्क यांचा एक्सचॅट अ‍ॅप आला; व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामला टक्कर देणार

एलॉन मस्क यांचा एक्सचॅट अ‍ॅप आला; व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामला टक्कर देणार

एलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ने अखेर आपला मेसेंजर अ‍ॅप एक्सचॅट सादर केला आहे. मस्क यांचे हे नवीन मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि चीनच्या वूईचॅटला टक्कर देण्यासाठी आणले आहे. एलॉन मस्क यांच्या एक्सला ऑल इन वन अ‍ॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे या अ‍ॅपची टक्कर आता चीनच्या वूईचॅटशी सुद्धा होणार आहे. हे अ‍ॅप एक्सवर यूजर्ससाठी वेगळ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे.

एक्सचॅट काही सिक्योरिटी फिचर्सवर खास फोकस करत आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त यूजर्स सर्व्हिसला वापर करण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे. आपल्या अधिकृत पोस्टवरून मस्क यांनी एक्सवर खुलासा केला आहे की, एक्सचॅटमध्ये बिटकॉईन स्टाईल एनक्रिप्शन, डिस्अ‍ॅपीअरिंग मेसेज आणि क्रॉस-प्लॅटफॉर्म ऑडियो आणि व्हिडीओ कॉल यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या अ‍ॅपमध्ये एक्सचॅट यूजर्स एकमेकांना फाईल्ससुद्धा शेअर करू शकतील. यामुळे मस्क यांचे अ‍ॅप हे मार्केटमधील व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामला जोरदार टक्कर देऊ शकते, असे बोलले जात आहे.

नव्या एक्सचॅटमध्ये एनक्रिप्शन आणि मेसेज डिस्अ‍ॅपीअरिंग व कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करण्यासोबत फिचर्सला रोलआऊट करण्यात आले आहे. यामध्ये ऑडिओ आणि कॉलिंगचा समावेश आहे. मस्क यांच्या माहितीनुसार, एक्सचॅट हे रस्टवर आधारित आहे. जो एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. या लँग्वेजमध्ये एक बिटकॉइनसारखे एनक्रिप्शन सिस्टम आहे.

एक्सचॅट सध्या बीटा फेजमध्ये असून काही निवडक यूजर्स आणि डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय, एक्सचॅट हे एक्सच्या काही पेड सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. आगामी काळात हे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले जाईल की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु मस्क यांच्या पोस्टनुसार, एक्सचॅट लवकरच अँड्रॉईड, आयओएस आणि वेब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;