लडाखमध्ये 85 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांसाठी राखीव, केंद्र सरकारचा निर्णय

लडाखमध्ये 85 टक्के नोकऱ्या भूमिपुत्रांसाठी राखीव, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने लडाखसाठी नवीन आरक्षण आणि अधिवास प्रणाली घोषणा केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना रोगजार आणि विकासात मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार लडाखमधील नोकऱ्यांत 85 आरक्षण भूमिपुत्रांसाठी असणार आहे. तसेच एकतृतीयांश नोकऱ्या या महिलांसाठी आणि आर्थिक मागास असलेल्या वर्गासाठी 10 टक्के आरक्षण असणार आहे.

नव्या नियमांनुसार लडाखमध्ये जी व्यक्ती गेली 15 वर्ष वास्तव्यास आहे, ज्यांनी सात वर्ष शिक्षण घेतले आहे किंवा ज्यांचे शिक्षण 10 किंवा 12 वी आहे त्यांना हे अधिवास प्रमाणपत्र मिळेल. या शिवाय केंद्र सरकारचे कर्मचारी, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रा, केंद्रीय विद्यापीठात कर्मचाऱ्यांनाही अधिवास प्रमाणपत्र मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांनी लडाखमध्ये 10 वर्ष काम केले आहे त्यांची मुलंही डोमिसाईलसाठी पात्र ठरतील. डोमिसाईल सर्टिफिकेटचा स्थानिकांना नोकरी मिळवण्यात उपयोग होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;