आधी बोंब, आता अजित पवारांच्या मांडीवर बसा; मिंधे गटाला अंबादास दानवेंचा टोला

आधी बोंब, आता अजित पवारांच्या मांडीवर बसा; मिंधे गटाला अंबादास दानवेंचा टोला

मिंधे गटाचा नेत्यांनी आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मांडीवर बसा, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला लगावला आहे.

मिंधे गटाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थमंत्री अजित पवार यांची तक्रार केल्याचं बोललं जात आहे. दादा पैसाच देत नाहीत भाई… कामं कशी करायची? अशी ‘वन टू वन’ तक्रारच त्यांनी शिंदेंकडे केल्याचे सांगितले जाते. यावरूनच माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, “ज्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते, त्यावेळी तुम्ही काय सांगितलं होतं? अजित पवार निधी देत नाही म्हणून जातोय. आता अजित पवार निधी देत नाही, ही तुमचीच बोंब आहे. शिक्षण विभागाचे काही विषय असल्याने मी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे गेलो होतो. शिक्षकांना वेगवेगळ्या टप्प्यात पगार द्यायचं ठरलं आहे. मात्र निधी कुठे आहे? जलजीवनच्याही सगळ्या योजना आधांतरी आहेत. केंद्र सरकारची इतकी महत्त्वाची योजना आहे, मात्र राज्य सरकार त्याला निधी देत नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;