Latur- लातूरात मुसळधार! शहर जलमय, अनेक घरांत शिरले पाणी, रस्त्यावर दीड फूट पाणी
लातूर शहरात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत.अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या पावसाळापुर्व कामाचे धिंडवडे निघाले आहेत.
शहरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वातावरण बदल होत पाऊस सुरू झाला. वारे अधिक नव्हते पण पावसाचा जोर अधिक होता.
आठ दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते. हवामान खात्याने दररोज पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे. तीन तासाअगोदर अंदाज दिला जात आहे. पावसाच्या तीव्रतेचा अंदाज आधीच वर्तवलेला असताना, लातूर महानगरपालिकेच्या तयारीचा अभाव स्पष्ट दिसून आला. शहरातील सखल भागांत पाणी साचण्याची समस्या गंभीर बनलेली असते पण यावेळी शहरभर ही समस्या निर्माण झाली होती. रस्त्यावर फुट दिड फुट पाणी वाहात होते. त्यांचे मुख्य कारण म्हणजे नाले, गटारी साफ न करणे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्ते जलमय झाले होते.
Latur Deluged by Heavy Rains: City Waterlogged, Homes Flooded, Roads Under 1.5 Feet of Water
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List