25 वर्षांनी मोठी आहे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी, विमानातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा आल्या चर्चेत
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन हे सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी ते व्हिएतनामच्या हनोई विमानतळावर त्यांचे विमान उतरले. मॅक्रॉन विमानातून बाहेर येत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्यांची पत्नी त्यांच्या चेहऱ्याला जोरात ढकलताना दिसत आहे. दरम्यान अनेकांनी मॅक्रॉन यांना त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांनी कानशिलात लगावल्याच्या बातम्या दिल्या. दरम्यान मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून तसे काहीही घडले नसून त्यांची मस्करी सुरू असल्याचे म्हटले आहे.
इमॅन्युल व ब्रिगिट यांची लव्हस्टोरी ही एकदम हटके आहे. इमॅन्युल हे 47 वर्षांचे आहेत. तर ब्रिगिट या 72 वर्षांच्या आहेत. त्या दोघांमध्ये तब्बल 25 वर्षांचा फरक आहे. ब्रिगिट यांचे आधीही एक लग्न झाले होते. त्या लग्नापासून त्यांना एक मुलगा असून तो मुलगा देखील इमॅन्युल यांच्यापेक्षा मोठा आहे. ब्रिगिट याचा 2006 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी इमॅन्युल यांच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या वेली इमॅन्युल 28 वर्षांचे तर ब्रिगिट या 53 वर्षांच्या होत्या. ब्रिगिट या इमॅन्युल शिकत असलेल्या शाळेत ड्रामा शिक्षिका होत्या. तेव्हापासून त्यांची ओळख होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List