बागेश्वर धाममधून परतताना एकाच कुटुंबातील 7 जणांनी संपवले जीवन, कारण अस्पष्ट

बागेश्वर धाममधून परतताना एकाच कुटुंबातील 7 जणांनी संपवले जीवन, कारण अस्पष्ट

हरयाणातील पंचकुलाच्या सेक्टर-27 मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.येथे डेहराडूनमधील एका कुटुंबातील 7 जणांनी कारमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले. सेक्टर 27 मधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये सर्वांचे मृतदेह आढळल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबावर कर्जाचा भार असल्यामुळे, या तणावातून या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देहरादून येथील रहिवासी प्रवीण मित्तल हे त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर, देहरादूनला परतताना, त्यांनी सामूहिक आत्महत्येचे हे पाऊल उचलले. मृतांमध्ये डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल (42), प्रवीणचे आई वडील, पत्नी, दोन मुली आणि एका मुलगा यांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे. सध्या हे सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून तपासणीसाठी नमुने गोळा केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर