पाणावलेल्या डोळ्यांनी राहुलने भाऊ मुकुल देवला दिला अंतिम निरोप; विंदु दारा सिंहलाही अश्रू अनावर
'सन ऑफ सरदार'मधील भूमिकेसाठी लोकप्रिय असलेले अभिनेते मुकुल देव यांचं शुक्रवारी 23 मे रोजी निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुल यांच्या पार्थिवावर त्यांचे भाऊ आणि अभिनेते राहुल देव यांनी अंत्यसंस्कार केले.
मुकुल देव यांच्या पार्थिवावर दिल्लीतील दयानंद मुक्ती धाम इथं अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी कुटुंबीयांसह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. मुकुल यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांना भाऊ राहुल देव हात जोडून नमस्कार करताना दिसले.
अभिनेते विंदु दारा सिंह हे मुकुल यांना भावासारखे मानायचे. या दोघांनी 'सन ऑफ सरदार'मध्ये एकत्र काम केलं होतं. मुकुल यांना अखेरचा निरोप देताना विंदु यांना अश्रू अनावर झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List