पिवळी साडी,अंगभर दागिने; जेव्हा ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर रथातून भव्य एन्ट्री झाली, फक्त टाळ्यांचा कडकडाट
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात 17 मे पासून झाली आहे. दरवर्षी बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कान्स चित्रपट महोत्सवाचा भाग असले तरी 2002 पासून कान्स चित्रपट महोत्सवात सतत दिसणारा एक चेहरा म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचे आकर्षण दाखवणार आहे. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती तेव्हा ऐश्वर्याकडे पाहून सर्वजण बघत राहिले होते.
पिवळी साडी, अंगभर सोनेरी दागिने अन्….
हे वर्ष 2002 होतं जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या कान्समध्ये आली होती तेही चक्क रथातून. पिवळी साडी, अंगभर सोनेरी दागिने, मोकळे केसं अन् हलकासा मेकअप. अशा सुंदर रुपात जेव्हा ती रथातून कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली होती तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिला पाहून जो टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला होता तो तब्बल 10 मिनिटे सुरु होता. याबद्दलचा अनुभव ऐश्वर्यानेच एका मुलाखतीत सांगितला होता.
दरनम्यान ऐश्वर्यासोबत शाहरुख आणि संजय लीला भन्साळी देखील यावेळी कान्समध्ये उपस्थित होते. त्यावेळी हे तिघेही ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कान्समध्ये आले होते. त्या काळात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाबाबत एक वेगळीच क्रेझ दिसून आली.
10 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट
एका मुलाखतीत ऐश्वर्या राय म्हणाली होती की, ‘आम्ही केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर भारतीय चित्रपटांचे प्रतिनिधी म्हणूनही महोत्सवात सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्हाला आणि आमच्या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद मला नेहमीच लक्षात राहील. मला आठवतंय की आमच्यासाठी 10 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला. ऐश्वर्या राय आणि शाहरुख खानला पाहून लोक वेडे झाले आणि ओरडू लागले . इतके प्रेम आणि प्रतिसाद पाहून कलाकारही खूप आनंदी झाले.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याची भव्य एन्ट्री
ऐश्वर्याने सांगितले होते की कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तिची एन्ट्री खूप भव्य पद्धतीने झाली. याबद्दल ऐश्वर्या म्हणाली होती, ‘आम्ही (ऐश्वर्या, शाहरुख आणि संजय लीला भन्साळी) एका रथावरून रेड कार्पेटवर प्रवेश केला. हा एक मोठा सन्मान होता कारण पहिल्यांदाच एखाद्या भारतीय चित्रपटाचे अशा प्रकारे प्रदर्शन होत होते. चित्रपटानंतर आम्हाला मिळालेला 10 मिनिटांचा टाळ्या वाजवण्याचा आवाज, मिळालेली प्रशंसा आयुष्यभर लक्षात राहील.
Aishwarya Rai | Devdas Premiere
Cannes 2002 pic.twitter.com/9JuHw3oe9V— ThingsBrownPeopleDo (@BrownPeopleDo) December 25, 2019
चित्रपट कान्समधील ग्रँड थिएटर लुमियर येथे दाखवण्यात आला
‘देवदास’ हा चित्रपट कान्समधील ग्रँड थिएटर लुमियर येथे दाखवण्यात आला, जिथे सर्व महत्त्वाचे चित्रपट दाखवले जातात. 2002 पासून, ऐश्वर्या राय जवळजवळ दरवर्षी कान्सचा एक महत्त्वाचा भाग असते. प्रत्येक वेळी तिचे आकर्षक लूक्स चर्चेत असतातच. पण बऱ्याच वेळा ऐश्वर्या रायला तिच्या कान्स पोशाखांबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, पण अभिनेत्रीने कोणत्याही टीकेची पर्वा केली नाही. ऐश्वर्या अनेकदा कान्सच्या रेड कार्पेटवर तिचा पती अभिषेक बच्चनसोबत तर कधी मुलगी आराध्यासोबत दिसली. आताच्या 2025 च्या कान्समध्ये ऐश्वर्या तिची लेक आराध्यासोबत आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List