‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
भारत-पाक तणावासंदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे. अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी केल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे.
भारत-पाकच्या युद्धविरामानंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
त्यामुळे आता जगभरातून या निर्णयाचं समाधान व्यक्त केलं जात आहे. सर्व सामान्य नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता यावर सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता पहिल्यांदा या निर्णयावर रवीना टंडनने पोस्ट करत समाधान व्यक्त करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तिने या पोस्टमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्टमध्ये तिने नेमकं काय म्हटलं आहे?
रवीनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ” जर हे खरे असेल, तर हा एक ‘स्वागत निर्णय’आहे. #युद्धविराम. पण ही चूक पुन्हा करू नका, ज्या दिवशी भारत पुन्हा रक्तपात करेल. #राज्यपुरस्कृत दहशतवादी…कदाचित ते युद्धासाठीचं कृत्य असेल पण नंतर त्याला नरकाचं स्वरुप प्राप्त होईल. #IMF ने त्यांचे पैसे कुठे जातात याचा मागोवा ठेवला पाहिजे, मोठ्या शक्तींनी त्यांचे पूर्वीचे कर्ज परतफेड करण्यासाठी किंवा अधिक दारूगोळा खरेदी करण्यासाठी किंवा काहीही करण्यासाठी हे कर्ज मंजूर केले असेल. पण आता पुन्हा कधीही भारताने रक्तपात करू नये.”
तिची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रवीनाने IMFने त्यांचे पैसे कुठे जातात याचा मागोवा घेतला पाहिजे असं म्हणत त्यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यावरही सोशल मीडियावर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List