बदलापुरातील 150 वर्षे जुन्या वटवृक्षाला अखेर जीवदान मिळाले; नागरिकांच्या दत्त चौकाचे अबाधित रेट्यानंतर अस्तित्व राहणार
बदलापूर शहरात उभारण्यात येत असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी बदलापुरातील सुमारे 150 वर्षे जुन्या वटवृक्षाचा बळी जाणार होता. मात्र बदलापूरच्या दत्त चौक परिसराची ओळख असलेल्या या वटवृक्षाला हटवण्याविरोधात वृक्षप्रेमी तसेच स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत नगर परिषदेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. बदलापूरकरांच्या या रेट्यामुळे अखेर नगर परिषद प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला जीवदान मिळाले असून दत्त चौकाची ओळखही कायम राहील. गुरुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यात शहरातील विविध भागांतील 16 वृक्षांना हटवले जाणार आहे. यात म्हात्रे चौकातील 3, समर्थ चौकातील 3, गणेश चौकातील 3, श्री कॉम्पलेक्स येथील 1 आणि दत्त चौकातील एका झाडाचा समावेश आहे.
यापूर्वी तीन वृक्ष हटवले होते
बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकात असलेले वडाचे झाड हे त्या परिसराची सर्वात जुनी ओळख आहे. हे झाड सुमारे 150 वर्षे जुने असण्याची शक्यता आहे. आजही पत्ता सांगताना या वडाचा उल्लेख केल्याशिवाय पत्ता पूर्ण होत नाही. आधीच दत्त चौकातील तीन महत्त्वाचे वृक्ष यापूर्वी हटवण्यात आले होते. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयावर स्थानिक रहिवासी आणि बदलापूरकर संताप व्यक्त करत होते. मात्र नागरिकांच्या मागणीपुढे पालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे वडाचे झाड वाचवण्याचा नागरिकांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List