राणी मुखर्जीने तोंडाने सापाचे विष बाहेर काढले… व्हिडिओ पाहिल्यावर माधुरीचे पती डॉक्टर नेनेंनी डोक्यालाच हात लावला
बॉलिवूडच्या अशा अनेक जुन्या चित्रपटांमध्ये भरभरून ड्रामा पाहायला मिळायचा. असे काही दृश्ये दाखवले जायचे की ज्यात कोणतेही तर्क किंवा कारण नसायचे. जसं की, बंदुकीतून सुटलेली गोळी हाताने पकडणे, सायकलच्या मागे लपून शत्रूशी लढणे… अनेक चित्रपटांमध्ये वैद्यकीय शास्त्राशी संबंधित असे अर्थहीन दृश्ये दाखवले गेले की ते पाहिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे. त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीच्या एका चित्रपटातील अस काही दृश्य पाहिले होते की ते पाहिल्यावर त्यांनी थेट डोक्यालाच हात लावला होता.
राणी मुखर्जीच्या चित्रपटातील तो सीन पाहिला आणि डॉक्टर नेनेंनी डोक्यालाच हात लावला
राणी मुखर्जीचा ‘राजा की आएगी बारात’ मधील राणी मुखर्जी नायकाच्या पायातून सापाचे विष शोषत असलेला सीन त्यांनी डॉ. नेनेंनी पाहिला.त्यांना त्यावर विश्वासच बसेना. माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. नेने हे अमेरिकेतील एक अव्वल हृदयरोगतज्ज्ञ आहेत. तसेच, ते एक व्लॉगर आहे. चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अर्थहीन (तर्कहीन) वैद्यकीय विभागांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटातील एक क्लिप शेअर केली आहे. आधी क्लिप पाहिली आणि नंतर डोळे मोठे करून आश्चर्य व्यक्त केलं आहे. मग ते म्हणाले, ‘मला याचा संदर्भ माहित नाही पण मला वाटते की आपण जे पाहत आहोत ते जुन्या बायकांच्या कथेवर आधारित आहे की जर तुम्हाला साप चावला तर त्याचे विष शोषून घ्या आणि रुग्ण बरा होईल.’
डॉ. नेनेंची व्हिडीओवर प्रतिक्रिया
डॉ. श्रीराम नेने यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘ऐका, जेव्हा तुम्हाला न्यूरोलॉजिकल इफेक्ट किंवा इतर इफेक्ट दिसायला लागतात, तेव्हा त्या व्यक्तीला विषाचा डोस मिळालेला असतो.त्यामुळे काही बदल होईल की नाही हे मला माहित नाही. तथापि, जर तुम्ही घटनास्थळी असाल, तर तुम्ही टूर्निकेट (बँड) लावू शकता आणि नंतर रुग्णाला रुग्णालयात पटकन नेणं शक्य असेल तर न्यावे किंवा त्याला तोपर्यंत त्याला अँटीवेनम देऊ शकता.’ माधुरीच्या पतीनेही चित्रपटातील दृश्यांबद्दल सांगितले की, त्यातील बहुतेक दृश्ये सिनेमाची कथा म्हणून दाखवण्यात आली असली त्यांनाहे वास्तववादी वाटत नाही.
राणी मुखर्जीचा हा चित्रपट आठवतोय का?
1997मध्ये ‘राजा की आएगी बारात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याद्वारे राणी मुखर्जीने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. या चित्रपटाच्या कथेपासून ते गाणी आणि दृश्यांपर्यंत सर्व काही खूप लोकप्रिय झाले. या साप चावण्याच्या दृश्याचीही खूप चर्चा झाली.
घरी मुंगूस आणि कुत्रे पाळत असत
तसेच डॉक्टर नेनेंनी हेही सांगितले की पूर्वीच्या काळात त्यांचे कुटुंब सापांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुंगूस आणि कुत्रे कसे पाळत असतं.ते म्हणाले, ‘भारताच्या अनेक भागात… लक्षात ठेवा की भारत हा एक भारत नाही. आपला देश 30% मेट्रो आणि 70% ग्रामीण आहे. आणि कोकणसारख्या ग्रामीण भागात जिथे माझे कुटुंब दोन पिढ्यांपूर्वी राहत होते, तिथे कोब्रा आणि इतर साप असायचे. त्यांच्यामुळे अनेक लोक मरत असत. तेव्हापासून मग लोकं त्यांच्या घरी संरक्षणासाठी मुंगूस आणि कुत्रे पाळत असत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List