कोकणात आता हायटेक रो-पॅक्स बोटीतून चला, मुंबई ते मालवण इतक्या कमी वेळात गाठा

कोकणात आता हायटेक रो-पॅक्स बोटीतून चला, मुंबई ते मालवण इतक्या कमी वेळात गाठा

मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा ( अलिबाग ) रो-रो सेवेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून आता कोकणातही हायटेक रो-रो बोटीची सेवा सुरु होणार आहे. या रो-रोतून चाकरमान्यांना त्यांच्या वाहनांना देखील ठेवता येणार आहे. या M2M कंपनीच्या बोटीला आज भाऊच्या धक्क्याला आणण्यात आले होते. ही बोट पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी झाली होती. ही रो-रो कम प्रवासी बोट अत्यंत सुरक्षित असून या रो-रो बोटीची सेवा सध्या अलिबागसाठी गेली तीन वर्षे सुरु आहे.

हायटेक रो-रो बोटीसाठी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. कोकणासाठी हायटेक रो-रो बोट आज किंवा उद्या भाऊच्या धक्क्यावर दाखल होणार.या बोटीच्या रंगीत तालमीच्या वृत्ताने कोकणवासीयांनीही मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर मोठी गर्दी केली होती. कोकणात ‘ही सेवा लवकर सुरु करावी’ अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रो-रो M2M कंपनीची ही हायटेक बोट एखाद्या क्रुझप्रमाणे असून तिची किंमतच ५५ कोटी इतकी आहे. या अत्याधुनिक बोटीत ५०० प्रवासी आणि १५० वाहने ठेवण्याची क्षमता आहे. बोटीचा वेग २४ नॉटिकल माईल्स इतका असून मुंबई ते मालवण अवघ्या ४ तासांत पार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने कोकणात जाण्यासाठी लागणाऱ्या १० ते १२ तासांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी वेळ लागणार आहे.

मुंबई ते कोकण थेट सेवा अपेक्षित

कोकणात गणपतीत जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेच्या तिकीटांचे रिझर्व्हेशन मिळताना मारामार असते. त्याचे मुंबई ते गोवा एक्सप्रेसवेचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले असून यंदाही हा मार्ग संपूर्ण क्षमतेने चालु होईल का नाही याबाबत सांशकता आहे. त्यामुळे जर रो-रो सेवा गणपतीच्या मुहूर्तावर सुरु झाली तर प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.मुंबईहून रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग या ठिकाणी थेट सेवा अपेक्षित आहे. कोकणवासीयांमध्ये नव्या रो-रो सेवेबाबत उत्सुकता आणि समाधानाची भावना वर्तविण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;