तुरुंगातील अंडरवर्ल्ड डॉनच्या गर्लफ्रेंडचं सौंदर्य पाहून जेलरचं सुटलं नियंत्रण, बाथरुममध्ये सीसीटीव्ह लावले आणि…
अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम याची गर्लफ्रेंड म्हणून आजही चर्चेत असणारी अभिनेत्री मोनिका बेदी हिच्या आयुष्यातील असे अनेक किस्से आहे जे समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. करियरच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्री अबू सलेम याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि स्वतःचं संपूर्ण करीयर उद्ध्वस्त करुन घेतलं. त्याकाळी मोनिका हिच्या सौंदर्यावर असंख्य लोकं फिदा होती. अशात तुरुंगात गेल्यानंतर देखील जेलर मोनिकाच्या सौंदर्याने मोहित झाला.
बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिकाला प्रथम भोपाळच्या जहांगीराबाद पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आणि नंतर भोपाळ मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. तुरुंगात असताना मोनिका पश्चाताप देखील होत होता. पण तुरुंगात देखील एक मोनिकाचा चाहता होता. जो तिच्यासाठी काही दिवसांनंतर धोक्याची घंटा ठरला.
खरंतर, भोपाळ सेंट्रल जेलचा जेलर पुरुषोत्तम सोमकुंवर मोनिकाच्या सौंदर्याने वेडा झाला होता. मोनिकाला पाहिल्यानंतर जेलर स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसायचा. मोनिका तुरुंगात असताना जेलर अभिनेत्रीच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता. अशी देखील माहिती समोर आली होती की, मोनिका हिला तुरुंगात अंघोळीसाठी साबण देखील दिला जायचा.
एवढंच नाही तर, तुरुंगात असताना मोनिका हिच्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमधून जेवणं यायचं. अभिनेत्रीचं सौंदर्य बिघडू नये म्हणून, सर्व प्रकारचे सौंदर्यप्रसाधने देखील तुरुंगात पोहोचवण्यात आली होती. मोनिका तुरुंगात असल्यामुळे अधिकारी कामाचे तास संपल्यानंतर देखील घरी जात नव्हते. पण एक दिवस तर हद्दच पार झाली.
तुरुंगात असं काही घडलं ज्याची चर्चा सर्वत्र तुफान रंगली. ज्या तुरुंगात मोनिका कैदी म्हणून होती, तेथील बाथरुम मधील काही फोटो तुफान व्हायरल झाले. तेव्हा बाथरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला. हे सर्व कॅमेरे जेलर पुरुषोत्तमने लावले होते.
अशा परिस्थितीत, जेलरवर मोनिकाचा एमएमएस बनवण्यासाठी कॅमेरे बसवल्याचा आरोप होता. कारवाईनंतर, जेलरला त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याबद्दल अटक करण्यात आली. सांगायचं झालं तर, अबू सलेम याच्यामुळे मोनिका तब्बल 1 वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List