या बॉलिवूड अभिनेत्रीने केली चार लग्न; दोघे पाकिस्तानी, तर दोघे भारतीय; घटस्फोटानंतर पाकिस्तानमध्ये राहतेय या व्यक्तीसोबत
बॉलिवूडमध्ये एकपेक्षा जास्त लग्न अफेअर या गोष्टी नक्कीच सामान्य झाल्या आहेत. पण एक अशी अभिनेत्री आहे जिची चर्चा सध्या जास्तच होऊ लागली आहे. कारण या अभिनेत्रीने चक्क चार लग्न केली. ही बॉलिवूड अभिनेत्री पाकिस्तानहून भारतात आली होती.
कोण होती ही पाकिस्तानी अभिनेत्री जिने बॉलिवूडवरही राज्य केलं
ही अभिनेत्री म्हणजे झेबा बख्तियार. पण ही अभिनेत्री केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही खूप लोकप्रिय आहे. ती बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक सुपरहीट चित्रपट दिले. ऋषी कपूर यांच्यासोबतचा ‘हिना’ चित्रपट तर विशेष गाजला होता. या चित्रपटातील काही भाग राज कपूर यांनी दिग्दर्शित केले होते तर उर्वरित भाग त्यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात झेबाचा ऋषी कपूरसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती.
अभिनेत्रीने केली चार लग्न
झेबा अभिनयापेक्षाही तिच्या प्रेमसंबंधांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात चक्क चार वेळा लग्न केलं. यापैकी दोघेजण पाकिस्तानी तर दोघेजण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नावे होती. त्यापैकी एक लोकप्रिय गायक आहे आणि दुसरा एक लोकप्रिय विनोदी कलाकार आहे.झेबाने पहिले लग्न 1982 मध्ये सलमान गलियानीशी केले. त्यानंतर, अभिनेत्रीने 1989 मध्ये दुसरे लग्न प्रसिद्ध विनोदी कलाकार जगदीप यांचा मुलगा आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते जावेद जाफरीशी केले. त्यांचे लग्न फक्त 2 वर्षे टिकलं.
आता या व्यक्तीसोबत राहतेय पाकिस्तानात
यानंतर, लोकप्रिय गायक अदनान सामीने झेबाच्या आयुष्यात प्रवेश केला. झेबाने 1993 मध्ये अदनानशी लग्न केले. त्यांचे हे लग्नही फक्त 4 वर्षेच टिकले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.त्यानंतर 2008 मध्ये या अभिनेत्रीने सोहेल खानशी चौथे लग्न केले.
एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या या लग्नाबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की तिने तिचे नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण तिला यात यश आले नाही. अभिनेत्री पुढे म्हणाली की कोणतीही मुलगी लग्न मोडू इच्छित नाही, परंतु एक वेळ अशी येते जेव्हा काही गोष्टी असह्य होतात आणि तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. अखेर आता झेबा पाकिस्तानातच वास्तव्यास आहे. ती आता तिचा चौथा पती सोहेल खान लेघारीसोबत पाकिस्तानमध्येच राहत आहे.
झेबाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर…
जर आपण कामाच्या बाबतीत पाहिले तर तिने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात हिंदी चित्रपट ‘हिना’ द्वारे केली. यानंतर ती स्टंट मॅन आणि जय विक्रांत सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय, ती चीफ साहब, मुस्लिम आणि बिन रॉय सारख्या पाकिस्तानी प्रोजेक्टमध्येही तिचा सहभाग दिसला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List