एकेकाळी वॉचमन अन् केमिस्ट म्हणून काम करणारा अभिनेता करतोय बॉलिवूडवर राज्य; 160 कोटींचा मालक
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. पण काहींच्या यशामागे असतो एक प्रेरणादायी संघर्षाचा प्रवास. असाच एक प्रेरणादायी प्रवास आहे एका बॉलीवूड अभिनेत्याचा ज्याने त्याच्या संघर्षाने, जिद्दीने आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर हा अभिनेता आता बॉलिवूडवर राज्य करतोय.
या अभिनेत्याने एकेकाळी वॉचमन आणि केमिस्ट म्हणून काम केलं
या अभिनेत्याने एकेकाळी वॉचमन आणि केमिस्ट म्हणून काम केलं आणि हाच अभिनेता 160 कोटींचा मालक असून एखाद्या महालासारख्या घरात राहतो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीक. त्याने आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दलचे अनुभव एका मंचावर शेअर केले होते. त्याने सांगितले होते की, अभिनयाची पहिली गोडी त्याच्या मनात तेव्हा निर्माण झाली जेव्हा त्याने वडोदऱ्यात एका नाटकाचा अनुभव घेतला. त्या आधी त्यांचे कुटुंब एकत्र बसून रामलीला नाटके पाहायचे.
“मी स्वतःला रामाच्या भूमिकेत कल्पना करायचो”
नवाजुद्दीनने सांगितलं, “आम्ही कुटुंबासोबत रामलीला नाटक पाहायचो. तो माझा अभिनयाशी पहिला परिचय होता. माझ्या एका मित्राने रामाची भूमिका साकारली होती आणि त्याला स्टेजवर पाहून मी थक्क झालो. मी स्वतःला रामाच्या भूमिकेत कल्पना करायचो,”
कॉलेज पूर्ण केल्यानंतर नवाजुद्दीन यांनी वडोदऱ्यात केमिस्ट म्हणून काम केलं. तिथेही त्याने एक नाटक पाहिले. त्या रात्री अभिनेता बनण्याचे स्वप्न त्याच्या मनात रुजल. हा अनुभव सांगताना तो म्हणाला, “त्या नाटकाने माझ्या मनात अभिनयाचे स्वप्न निर्माण केले.”
सांगितला मुंबईत येण्याचा अनुभव
पुढे नवाजुद्दीन यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळाला आणि त्याचा प्रवास मुंबईपर्यंत पोहोचला. मुंबईत येण्याचा अनुभव त्याच्यासाठी वेगळाच होता. हा अनुभव शेअर करताना त्याने सांगितले “मुंबईत आलो तेव्हा सर्व काही किती वेगवान आहे हे पाहून मी थक्क झालो. या शहराच्या गतीशी जुळवून घेण्यास मला जवळपास एक महिना लागला. मला वाटायचे की मी कधीच या गतीशी जुळवून घेऊ शकणार नाही,”
नवाजुद्दीनने आपल्या मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. आज त्याचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही पसंतीस उतरतो. त्यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List