मराठमोळ्या अभिनेत्याला दिग्दर्शकाने रोल देण्यास दिला नकार, म्हणाला ‘मी तुझ्या समोर नागडा…’
एका चित्रपट स्टारने माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबत काम केले. त्याने अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले, पण तो त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जायचा. आजही तो बेधडकपणे आपले भाव व्यक्त करतो, ज्यामुळे वातावरण अनेकदा अडचणीचे बनते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नाना पाटेकर आहेत. त्यांचा अमोल पालेकर यांच्यासोबतचा किस्सा आहे. नेमका काय आहे चला जाणून घेऊया…
असे म्हणतात की, जेव्हा अमोल पालेकरांना कळले की नाना पाटेकर यांनी ‘परिंदा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्यावर हात उगारला होता, तेव्हा त्यांनी नाना पाटेकर यांना ‘थोड़ा सा रूमानी हो जाएं’ या चित्रपटात कास्ट करण्याचे टाळले. मात्र, नाना पाटेकर यांच्या वारंवार विनंतीनंतर अमोल पालेकर तयार झाले. अमोल पालेकर यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना चित्रपटात त्यांच्या कास्टिंगमागील खरे कारण सांगितले.
वाचा: जीनत अमानसोबत रोमांस करण्यास नकार, पण या अभिनेत्रीसाठी मोडल्या इंटिमेसीच्या मर्यादा
नाना पाटेकर यांच्या रागीट स्वभावाबद्दल यापूर्वीही अनेक कलाकारांनी बोलले आहे. अमोल पालेकर यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मी त्यांना त्यांच्या तापट स्वभावामुळे नाकारले नव्हते. ती भूमिका फक्त रागीट व्यक्तीची नव्हती. खरंतर, त्या पात्राला कवीचे हृदय हवे होते. ते खूप मृदू होता. मी नानांना सांगितले होतं, ‘तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात ती मृदुता नाही. तू ती साकारू शकणार नाहीस.’”
‘परिंदा’मधील भूमिकेमुळे बदलली होती प्रतिमा
नाना पाटेकर यांनी अमोल पालेकर यांच्या टीकेला मनावर न घेता सातत्याने त्यांना चित्रपटात कास्ट करण्याची विनंती केली. अमोल पुढे म्हणाले, “ते मला समजावत राहिले. तो काळ होता जेव्हा ‘परिंदा’ हिट झाला होता. त्यांची भूमिका सुद्धा हिट होती. त्यांना ‘अँग्री यंग मॅन’प्रमाणे दाखवण्यात आले होते. त्या वेळी लोक याबद्दलही बोलत होते की नानांनी विधु विनोद चोप्रा यांना कसे मारले होते. दोघांमध्ये हातापायी झाली होती.”
10 दिवसांत पूर्णपणे बदलला स्टार
अमोल पालेकर पुढे म्हणाले, “खरंच, ते माझ्या पात्राच्या जवळपासही दिसत नव्हते, पण त्यांनी हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि माझ्याकडे 10 दिवसांसाठी आले आणि माझ्यासोबत सराव केला. ते मला म्हणाले- मी तुझ्यासमोर नागडा उभा राहीन आणि तू मला तुझ्या हिशोबाने घडवशील. त्या 10 दिवसांच्या सरावात नाना पूर्णपणे बदलले. त्यांचे व्यक्तिमत्त्व बदलले. भांडण विसरा, संपूर्ण शूटिंगदरम्यान आमच्यात वादही झाला नाही.” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला.
‘परिंदा’च्या सेटवर का झाला होता वाद
विधु विनोद चोप्रा यांनी ‘सारेगामापा’ शोमध्ये ‘परिंदा’च्या सेटवर नाना यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, “चित्रपटात एक सीन आहे, ज्यामध्ये नाना विचारतात की पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत का? संपूर्ण दिवस शूटिंग चालली आणि संध्याकाळ झाली. नानांनी सांगितले की ते थकले आहेत, शूटिंग पुढे करू शकणार नाहीत. मी त्यांना पेमेंट करण्यास सांगितले. त्यांनी मला शिवी दिली, तेव्हा मीही दिली. हातापायीत मी त्यांचा कुर्ता फाडला. सेटवर उपस्थित पोलिसांनी सांगितले- ‘आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहोत आणि तुम्ही एकमेकांशीच भांडत आहात.’”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List