या बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलीयेत तीन लग्न, यांपैकी एका अभिनेत्याने वयाच्या 70 व्या वर्षी केलंय चौथं लग्न
बॉलिवूडमध्ये एक किंवा दोन लग्न होणे सामान्य आहे. बऱ्याचदा स्टार्सचे विवाहबाह्य संबंध असतात आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या पती किंवा पत्नीला सोडून दुसरे लग्न केले जाते, परंतु काही स्टार्स असे असतात ज्यांनी तीन वेळा लग्न केले आहे.कोण आहेत ते सेलिब्रिटीज पाहुयात.
कोण आहते ते सेलिब्रिटीज ज्यांनी तीन ते चारवेळा संसार थाटला?
लकी अली: कॉमेडी किंग मेहमूद अली यांचे पुत्र गायक आणि संगीतकार लकी अलीने तिनदा लग्न केलं आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव मेघन जेन मॅकक्लेरी होते. लकीने इनायाशी दुसरे लग्न केले. इनाया आणि लकी यांना दोन मुलेही होती. इनायापासून घटस्फोट घेतल्यानंतर, लकीने 2010 मध्ये वयाच्या 52 व्या वर्षी ब्रिटिश सुंदरी आयेशाशी लग्न केले. दोघांनाही डॅनी मकसूद अली नावाचा मुलगा आहे. लकी आयेशापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे.
सिद्धार्थ रॉय कपूर: निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यानेही तीन लग्ने केली आहेत. सिद्धार्थची पहिली पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण होती. यानंतर त्याने दुसऱ्यांदा एका टेलिव्हिजन निर्मातीशी लग्न केलं, परंतु 2008 मध्ये ते वेगळे झाले. अखेर तिसऱ्यांदा सिद्धार्थने 2011 मध्ये अभिनेत्री विद्या बालनशी लग्न केलं.
संजय दत्त: बॉलिवूड अभिनेता, सुपरस्टार संजय दत्तनेही तीन लग्ने केली आहेत. त्याचे पहिले लग्न 1987 मध्ये अभिनेत्री रिचा शर्मासोबत झाले होते. 1996 मध्ये रिचाच्या निधनानंतर संजयने 1998 मध्ये रिया पिल्लईशी लग्न केले. 7 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर संजयने 2008 मध्ये मान्यताशी लग्न केलं . मान्यता आणि संजयला दोन मुले देखील आहेत.
विधू विनोद चोप्रा : बॉलिवूडचे निर्माते-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनीही तीन लग्ने केली. त्यांचे पहिले लग्न 70 च्या दशकात फिल्म एडिटर रेणू सलुजा यांच्याशी झाले होते. यानंतर त्यांचे दुसरे लग्न शबनम सुखदेव यांच्याशी झाले. शबनमपासून वेगळे झाल्यानंतर, त्यांचे तिसरे लग्न 1990 मध्ये चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी झाले. आता ते दोघेही सध्या एकत्र आहेत.
करण सिंग ग्रोव्हर: अभिनेता करण सिंग ग्रोव्हरने 2008 मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमशी पहिले लग्न केले. हे लग्न फक्त 10 महिने टिकले. यानंतर, 2012 मध्ये, त्याने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केले. या जोडप्यातील मतभेदांमुळे 2014 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यानंतर, 30 एप्रिल 2016 रोजी करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केले.
कमल हसन : अभिनेते कमल हासन यांनी पहिले लग्न 1978 मध्ये शास्त्रीय नृत्यांगना वाणी गणपतीशी केले होते. दहा वर्षांनी दोघांचाही घटस्फोट झाला. यानंतर कमल हसनने 1988 मध्ये अभिनेत्री सारिकाशी दुसरे लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत. सारिकापासून वेगळे झाल्यानंतर ते अभिनेत्री गौतमीसोबत राहू लागले. या दोघांनी लग्न केले की नाही हे अद्याप पूर्णपणे कोणालाही माहित नाही.
विनोद मेहरा: अभिनेते विनोद मेहरा यांनीही 60 च्या दशकात तीन लग्ने केली. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी रेखाशीही लग्न केले होते या अर्थाने, त्यांचे चार लग्न झाली आहेत. विनोदने बिंदिया गोस्वामीशी दुसरे लग्न केले. काही महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर,1988 मध्ये, त्यांनी किरणशी तिसरे लग्न केले. 1990 मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत ते किरणसोबतच राहिले.
निलिमा अझीम: शाहिद कपूरची आई, अभिनेत्री निलिमा अझीम यांनीही तीन लग्ने केली. तिचे पहिले लग्न अभिनेता पंकज कपूरसोबत झाले होते. शाहिद कपूर हा त्याचा मुलगा आहे. शाहिदच्या जन्मानंतर काही दिवसांनी, 1984 मध्ये, तिचा पंकज कपूरशी घटस्फोट झाला. यानंतर तिने अभिनेता राजेश खट्टरशी लग्न केले. राजेशपासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिचे त्याच्याशी असलेले लग्नही फार काळ टिकले नाही. 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2004 मध्ये तिने उस्ताद राजा अली खान यांच्याशी लग्न केले.
कबीर बेदी : 70 वर्षीय अभिनेते कबीर बेदी यांनी चार लग्न केली आहेत. त्यांचे पहिले लग्न ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्याशी झाले होते. तिच्यापासून त्यांना दोन मुले आहेत. यानंतर, त्यांनी ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रीसशी दुसरे लग्न केले. सुसानपासून वेगळे झाल्यानंतर, त्यांनी तिसरे लग्न केले ते टेलिव्हिजन प्रेझेंटर निक्कीसोबत. तिच्यापासूनही वेगळे झाल्यावर त्यांनीप रवीन दुसांजशी चक्क वयाच्या 70 व्या वर्षी चौथे लग्न केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List