प्रसिद्ध अभिनेत्रीला खून प्रकरणात ठोकल्या बेड्या, तिचं माजी पंतप्रधानांसोबत खास कनेक्शन
झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक करण्यात आली ओह. खून प्रकरणात अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, बांग्लादेशी अभिनेत्री नुसरत फारिया आहे. नुसरत हिने ‘मुझिब: द मेकिंग ऑफ ए नेशन’ सिनेमात मुख्य भूमिका बजावली होती. सिनेमात नुसरत हिने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भूमिकाला न्याय दिला होता. ज्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. पण आता अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाक्यातील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. नुसरत हिला अटक करण्यात आल्यमुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला झालेली अटक जुलै २०२४ मध्ये शेख हसीना यांच्याविरुद्धच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित आहे.
सांगायचं झालं नुसरत फक्त 31 वर्षांची आहे. रिपोर्टनुसार, थायलंडला जात असताना अभिनेत्रीला इमिग्रेशन चेकपॉईंटवर थांबवण्यात आलं. तिच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे अभिनेत्रीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं. बांगलादेशातील चळवळींमुळे शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि नंतर त्या भारतात राहायला गेल्या.
शेख हसीना यांची साकारली भूमिका…
बड्डा झोनचे सहायक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी अभिनेत्रीच्या अटकेवर स्पष्टीकरण दिलं. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुजिब: द मेकिंग ऑफ अ नेशन’ या सिनेमात शेख हसीनाच्या भूमिकेसाठी नुसरत फारियाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा बांगलादेश आणि भारताच्या संयुक्त प्रयत्नातून बनवण्यात आला होता आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केला होता.
नुसरत फारिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी नुसरत रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती. तिने 2015 मध्ये ‘आशिकी: ट्रू लव्ह’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक बांगलादेशी आणि भारतीय सिनेमांमध्ये काम केलं. ती बहुतेक बंगाली सिनेमांमध्ये दिसली. ती टेलिव्हिजन होस्टिंग आणि मॉडेलिंगमध्ये देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List