अमेरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणं महागणार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नवीन कायदा आणण्याच्या तयारीत
अमरिकेतून हिंदुस्थानात पैसे पाठवणे महागणार आहे. अमेरिकेत राहणारे एनआरआय आणि हिंदुस्थानात राहणारे त्यांच्या नातेवाईकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
अमेरिकेत जवळपास 45 लाख अनिवासी हिंदुस्थानी राहतात. हे अनिवासी हिंदुस्थानी हिंदुस्थानात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पैसे पाठवतात. आता पैश्यांवर पाच टक्के कर लागणार आहे. हा कर एच 1 बी विजाधारक आणि ग्रीन कार्ड धारकांना द्यावा लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेच्या संसदेत हा कायदा आणण्याच्या तयारीत आहेत.
द वन बिग ब्युटिफूल बिल नावाने हे विधेयक एका समितीने जारी केले आहे. 389 पानाच्या या विधेयकातील 327 व्या पानावर या शुल्काचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार देशाबाहेर पैसे पाठवण्यावर पाच टक्के कर आकारला जाईल. अमेरिकेतून सर्वाधिक पैसे परदेशात पाठवल्या जाणाऱ्या देशात हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. 2023-24 साली अमेरिकेतल्या अनिवासी हिंदुस्थानींनी 32 बिलियन डॉलर्स आपल्या मायदेशी पाठवले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List