इस्त्रीवाल्याच्या मुलाने केली यूपीएससी क्रॅक, नांदेडच्या डॉ. शिवराज गंगावळला मिळाली 788 वी रँक
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये अनेक हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मराठवाड्यातील नांदेड येथील एका लाँड्री चालकाच्या मुलानेही यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. डॉ. शिवराज राजेश गंगावळ असे या तरुणाचे नाव आहे. एमबीबीएस केल्यानंतर शिवराजने यूपीएससीची तयारी करत हे यश मिळवले आहे. शिवराजचा 788 वी रँक मिळाली आहे.
शिवराज गंगावळचे वडील राजेश गंगावळ हे लाँड्रीचा व्यवसाय करतात. कठीण परिस्थिती असूनही त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना शिकवले. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. वडिलांच्या कष्टाचे चीज करत शिवराजने यूपीएससी क्रॅक केली. नांदेड जिह्यातील मुखेड तालुक्यात बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही शिवराज यांनी यूपीएससीची तयारी केली. त्यांना पाच वेळा परीक्षेत अपयश आले, परंतु त्यांनी हार मानली नाही. सहाव्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.
शिवराज गंगावळ यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. दहावी, बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर एमबीबीएसला नंबर लागला. एमबीबीएसची पदवी मिळाल्यानंतर ते वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झाले, परंतु केवळ नोकरी न करता यूपीएससीची तयारी सुरू केली. यासाठी कठोर मेहनत घेतली. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने हे सर्व शक्य झाल्याचे शिवराज यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List