रांगोळी पुसल्याच्या कारणातून 8 वर्षीय बालकाला बेदम मारहाण, सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रांगोळी पुसल्याच्या कारणातून कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी आठ वर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुण्यातील भवानीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
पीडित मुलाच्या आईचे निधन झाले आहे. वडील भंगारच्या दुकानात काम करून आपली उपजीविका करतात. दुपारी पीडित मुलगा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर सायकल चालवत होता. यावेळी मुलाकडून कारखान्यासमोरील रांगोळी पुसली गेली.
या क्षुल्लक कारणातून सुरक्षारक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाची पाठ काळी पडली. या घटनेनंतर परिसराती नागरिक संतप्त झाले असून सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List