तिच्या बोलण्यात इतका द्वेष..; मराठी अभिनेत्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं

तिच्या बोलण्यात इतका द्वेष..; मराठी अभिनेत्याने पाकिस्तानी अभिनेत्रीला सुनावलं

भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचं वातावरण असताना आता बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. या दोघांनी 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. परंतु पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर मावराने टीका केल्यानंतर हर्षवर्धनसुद्धा शांत बसला नाही. त्याने थेट ‘सनम तेरी कसम’च्या सीक्वेलमध्ये पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर मावरानेही त्याच्यावर पलटवार केला. हर्षवर्धनने हे वक्तव्य फक्त प्रसिद्धीसाठी केल्याची टीका तिने केली. यानंतर आता हर्षवर्धनने मावरासाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

‘लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने असं वक्तव्य केलंय’, अशी टीका मावराने हर्षवर्धनवर केली. त्यावर त्याने लिहिलं, ‘हा माझ्यावरील वैयक्तिक हल्ला असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सहनशीलता माझ्यात आहे. परंतु मी माझ्या देशाच्या प्रतिष्ठेविरोधात झालेला कोणताच हल्ला खपवून घेणार नाही. जेव्हा शेतात नको असलेलं गवत उगवतं तेव्हा भारतीय शेतकरी ते मुळासकट उपटून काढतो, त्याला तण काढणं म्हणतात. या गोष्टीसाठी शेतकऱ्याला पीआर टीमची गरज नसते. याला सामान्यज्ञान म्हणतात.’

‘मी फक्त सनम तेरी कसमच्या सीक्वेलमध्ये काम करण्यास नकार दिला. जे माझ्या देशाच्या कारवाईला भ्याड म्हणतात, त्यांच्यासोबत काम न करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तिच्या भाषणात इतका द्वेष आहे की तिने माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. मी कधीच तिच्या नावाचा उल्लेख केला नाही. एक महिला म्हणून मी तिच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझ्या दर्जा राखला आहे’, अशा शब्दांत हर्षवर्धनने सुनावलं आहे.

ऑपरेशन सिंदूरवर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका केली होती. यात ‘सनम तेरी कसम’मध्ये हर्षवर्धनसोबत काम केलेल्या मावराचाही समावेश होता. तिने भारतीय सैन्याच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. ‘निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अल्लाह आपल्या सर्वांचं रक्षण करो आणि हल्लेखोरांना सदबुद्धी देवो’, असं तिने लिहिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले… भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले,...
गोविंदाचे घर आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही, बार सेक्शन ते बेडरूम फारच सुंदर इंटेरिअर, प्रत्येक कोपरा वास्तुनुसार बांधलेला
heart attack: महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय? जाणून घ्या तज्ञांचे मत…
मोदी समर्थकांनी विक्रम मिसरी यांना केलं ट्रोल, कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी
पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला – हर्षवर्धन सपकाळ