मी बॅचलर आहे, जिच्यासोबत इच्छा असेल तिच्यासोबत…; महिलांबाबात सुपरस्टार अभिनेता हे काय बोलून गेला

मी बॅचलर आहे, जिच्यासोबत इच्छा असेल तिच्यासोबत…; महिलांबाबात सुपरस्टार अभिनेता हे काय बोलून गेला

फिल्म इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. कधी त्याच्या लव्ह अफेअरमुळे तर कधी घटस्फोटामुळे. बॉलिवूडमधील एक अभिनेता तर असा होता ज्याने एकेकाळी एकापेक्षा एक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते, पण करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्याने चित्रपटांपासून ब्रेक घेऊन अध्यात्माचा मार्ग निवडला होता. ते सुमारे 5 वर्षे अध्यात्मिक गुरू ओशोच्या आश्रमात राहिले. 1975 ते 1982 या काळात ओशोच्या आश्रयात राहणारे विनोद खन्ना एकेकाळी इंडस्ट्रीत त्यांच्या नातेसंबंधांसाठी ओळखले जायचे. अभिनेत्याने एका जुन्या मुलाखतीत महिलांशी असलेल्या शारीरिक नात्याबद्दल मोकळेपणाने बोलले होते.

सध्या सोशल मीडियावर रेडिटवर अभिनेत्याचा एक व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहेत. विनोद खन्ना क्लिपमध्ये म्हणताना दिसतात की ते कोणते संत नाहीत आणि त्यांच्या शरीराच्या गरजा इतर लोकांप्रमाणेच आहेत. अनेक महिलांशी असलेल्या नात्यांवर प्रतिक्रिया देताना विनोद खन्नाने स्पष्टीकरण दिले होते.

वाचा: अल्लाह हू अकबर.. जय श्री राम! माझ्या बॅगेत बॉम्ब आहे; विमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

विनोद खन्नाने सेक्सबद्दल मोकळेपणाने केली होती चर्चा

अभिनेता म्हणतो, ‘खरं तर, तेव्हा मी बॅचलर होतो आणि महिलांच्या बाबतीत मी कोणता संत नाही. मलाही सेक्सची गरज आहे, जितकी इतर कोणाला आहे. महिलांशिवाय आपण इथे नसतो, सेक्सशिवाय आपण इथे नसतो, मग माझा महिलांशी असलेल्या संबंधावर कोणाला आक्षेप का असावा?’

“Well, I was a bachelor, and I am no saint as far as women are concerned. I need s*x as much as anybody else does. Without women, we won’t be here, without s*x, we won’t be here, so why should anybody object to my being with women.” -Vinod Khanna
byu/ACTRESSESKAKURSI inBollyBlindsNGossip

अक्षय खन्नाने वडिलांच्या निर्णयावर दिली होती प्रतिक्रिया

2020 मध्ये विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नानेही आपल्या वडिलांच्या ओशोवरील विश्वासाबद्दल वक्तव्य केले होते. अक्षय खन्ना म्हणाला होता की, ‘मी पाच वर्षांचा असताना, वडिलांचा निर्णय समजून घेणं खूप कठीण होतं. ओशोचा माझ्या विचारांशी काहीही संबंध नाही. मला हे समजत नव्हतं की माझे वडील तेव्हा माझ्यासोबत का नव्हते. ओशोचा त्यांच्या आयुष्यात समावेश होणं मला समजलं नाही. हा एक जीवन बदलणारा निर्णय होता, जो त्यांनी (विनोद खन्ना) तेव्हा घेण्याची गरज वाटली. काहीतरी असं होतं ज्याने त्यांना आतून इतक्या खोलवर प्रभावित केलं, की त्यांना असा निर्णय घेणं योग्य वाटलं. विशेषतः जेव्हा तुमच्याकडे आयुष्यात सर्व काही आहे. आणि जेव्हा आयुष्य असं दिसत नाही की तुमच्याकडे आणखी काही असू शकतं.’

विनोद खन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल

विनोद खन्नाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने दोनदा लग्न केलं होतं. पहिलं लग्न त्यांनी गीतांजली यांच्याशी केलं होतं. या लग्नापासून त्यांना दोन मुलं, राहुल आणि अक्षय, आहेत. अक्षय खन्ना फक्त 5 वर्षांचा होता जेव्हा त्याचे वडील विनोद खन्ना त्यांना सोडून ओशोच्या आश्रमात गेले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानसोबत चर्चा ही फक्त पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावरच होईल असे सांगितले. तसेच...
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीसाठी आम्ही मदत केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी
पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, पाकिस्तानशी चर्चा फक्त POK वरच – पंतप्रधान मोदी
रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरची धडक, 13 जणांचा मृत्यू; रस्त्यावर पडला रक्त मांसाचा सडा
भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…