‘तिच्यासोबत रोमँटिक रिलेशन वाढवले…’ जूही चावलासोबत अफेयरबाबात ऋषी कपूर स्पष्टच बोलले
बॉलिवूडमधील फक्त आताच्याच जोड्या प्रसिद्ध नाहीयेत तर 70s,80s मधल्याही काही जोड्या ज्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी बनले. त्यातील प्रसिद्ध घराण्यातील एक जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू कपूर. ऋषी कपूर यांचे नीतू सिंग यांचा प्रेमविवाह झाला, पण लग्नानंतरही ऋषी कपूर यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. त्यातीलच एक होती ती म्हणजे जुही चावला. ऋषी कपूर आणि जुही चावला यांनी जवळपास 6 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एकत्र काम केल्यामुळे त्यांची नावे अनेक वेळा जोडली गेली. नीतू सिंगशी यांच्याशी लग्न ठरले होते तरी, ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्यातील अफेअरच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. तेव्हा ऋषी कपूर यांनी अखेर त्यांच्या नात्याबद्दलचे सत्य उघड केलं.
ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या नात्याची चर्चा
दोघांनी ‘बोल राधा बोल’ आणि ‘साजन का घर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ऋषी कपूर आणि जुही चावला यांची जोडी खूप आवडली. लवकरच त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही बदलली. त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. तर, एका मुलाखतीत जुहीसोबतच्या त्यांच्या अफेअरबद्दल विचारलं असता त्यांनी सरळ म्हटंल होतं की, ‘जुहीसोबतचे अफेअर हा एक पब्लिसिटी स्टंट होता. हे मान्य करण्यासाठी आणि जुहीसोबत राहण्यासाठी माझे ब्रेनवॉश करण्यात आले होते’
पडद्यावर माझी रोमँटिक प्रतिमा…
ऋषी कपूर पुढे म्हणाले, ‘मला सांगण्यात आले होते की पडद्यावर माझी रोमँटिक प्रतिमा खूप चांगली आहे, म्हणून मी जुहीसोबत रोमँटिक लिंक-अप करायला हवं त्यावेळी ते मला पटवून देण्यात आलं होतं. ‘
अमृता सिंग आणि डिंपल कपाडियासोबतही जोडले गेले होते नाव
ऋषी कपूर यांचे नाव केवळ जुही चावलासोबतच नाही तर अमृता सिंग आणि डिंपल कपाडियासोबतही जोडले गेले होते . पण ऋषी यांनी ते नाकारले आणि बातम्यांना बकवास म्हटलं. त्यांनी असेही म्हटले की अमृता त्यांना हव्या असणाऱ्या चौकटीत बसत नाही. इतर तरुण नायिकांशी त्यांचे नाव जोडल्याबद्दल विचारले असता, ऋषी कपूर म्हणाले, ‘मी असा नायक आहे ज्याने जास्तीत जास्त नवीन मुलींची ओळख करून दिली आहे. जर मी त्यांना प्रपोज केलं नाही तर मी त्या मुलींच्या मागे का धावेन? काजल, किरण किंवा पद्मिनी कोल्हापुरी यांना विचारा. मी त्यांना लहान मुलींसारखे वागवतो.
मी कधी तिला प्रपोज केलं का?
ऋषी कपूर पुढे म्हणाले होते, ‘ नीतू (सिंग) ला विचारा !’ हो, मी तिला खूप चिडवलं, पण मी कधी तिला प्रपोज केलं होतं का? जर तू माझ्यासोबत झोपला नाहीस तर मी तुला चित्रपटातून काढून टाकेन असे मी कधी म्हटले आहे का? आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध नव्हते. ती नवीन असताना मी इतक्या वर्षात तिच्या कधीच मागे लागलो नाही. आम्ही एकत्र किती चित्रपट केले हे देवाला माहीत आहे, आणि मला माहित होते की तिच्या मनात माझ्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे.” असं म्हणत ऋषी कपूर यांनी या सगळ्या अफवा खोट्या ठरवल्या.
ऋषी कपूर यांनी 23 जानेवारी 1980 रोजी नीतू कपूरशी लग्न केले. लग्नापूर्वी दोघांनीही अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. ऋषी आता या जगात नाहीत. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निधन झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List