बॉलिवूडच्या ‘हँडसम हंक’ने 30 हजार लग्नाचे प्रस्ताव धुडकावले, घटस्फोटानंतर 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आज भूमिकांसाठी 100 कोटींपर्यंतची मोठी रक्कम घेतात. पण असा एक अभिनेता ज्याला पहिल्यांदा त्याच्या कामासाठी फक्त 100 रुपये पगार मिळाला होता, आज तो इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
पहिलाच चित्रपट हा सुपरहिट ठरला
या अभिनेत्याने पदार्पण करताच त्याचा पहिलाच चित्रपट हा सुपरहिट ठरला. त्यांने पहिल्याचं चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याने इंडस्ट्रीला काही ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तो केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर त्याच्या डान्स कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील ओळखला जातो. एवढंच नाही तर पहिल्याच चित्रपटानंतर त्याची प्रसिद्धी आणि पसंती एवढी वाढली होती की, त्याला लग्नासाठी चक्क 30 हजार प्रपोजल आले होते.
चित्रपटाची बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई
बॉलिवूडच्या ‘हँडसम हंक’ म्हटला जाणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. ज्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमधला प्रवास सुरू केला होता. बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर, त्याने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शित चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. 2000 मध्ये ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं आणि या चित्रपटाने जगभरात 78.93 कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी चित्रपटाचे एवढे कलेक्शन होणे ही खरोखरच आश्चर्याची बाब होती.
30000 लग्नाचे प्रस्ताव आले
हृतिक रोशनने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना त्याचे वेड लावले. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्या काळात हजारो मुली या हृतिकच्या प्रेमात होत्या. चक्क त्याला चित्रपटानंतर 30000 लग्नाचे प्रस्ताव आले. त्यानंतर त्याने त्याची मैत्रीण सुझान खानशी लग्न केले. पण त्यानंतर लाखो मुलींची मने तुटली. पण लग्नाच्या 13 वर्षांनी त्यांचा घटस्फोटही झाला. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत, तरीही त्यांच्या नात्यात इतकी दुरावा निर्माण झाला की 2014 मध्ये त्यांना घटस्फोट घ्यावा लागला.
शाहरुख खाननंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत अभिनेता
चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. हा अभिनेता आता एका चित्रपटासाठी 100 कोटी घेतो आणि इतकेच नाही तर तो शाहरुख खाननंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. जर आपण हृतिक रोशनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर, सुझान खानशी घटस्फोट घेतल्यानंतर तो आता सबाला डेट करत आहे. दोघांच्या वयात तब्बल 12 वर्षांचा फरक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List