रेखा किंवा जया बच्चन नाही… अमिताभ बच्चन यांनी या बॉलिवूड अभिनेत्रीसाठी पाठवले होते ट्रक भरून गुलाब
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सुपरस्टार अमिताभ बच्चन वयाच्या 82 व्या वर्षीही चित्रपट आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते नेहमीच सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवरून चर्चेत असतात. त्यांनी 1969 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तर ते शेवटचे रजनीकांतच्या वेत्तैयां चित्रपटात दिसले होते. ते या वयातही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय अभिनेते आहेत. एवढंच नाही तर त्यांची अजून एक खासियत म्हणजे कोणत्याही अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं काम आवडलं तर ते त्यांना नेहमी शुभेच्छा देणारं एक कार्ड आणि फुलांचा बुके पाठवतात. पण तुम्हाला माहितीये का की अमिताभ यांनी एका अभिनेत्रीला चक्क ट्रकभरून गुलाब पाठवले होते.
जया बच्चन किंवा रेखाजींसाठी नव्हते तर या अभिनेत्रीला पाठावला होता फुलांनी भरलेला ट्रक
हे गुलाब त्या अभिनेत्रीचे कौतुक म्हणूनही पाठवले होते आणि तिने त्यांच्या चित्रपटासाठी तयार व्हावं यासाठीही होते. अमिताभ यांनी पाठवलेले ट्रक भरून गुलाब हे जया बच्चन किंवा रेखाजींसाठी नव्हते तर अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासाठी होते. कारण अमिताभ यांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती.
अमिताभ बच्चन यांनी असं का केलं होतं?
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खुदा गवाह’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी एकत्र काम केले होते. तथापि, श्रीदेवी या चित्रपटासाठी तयार नव्हत्या. पण अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला चित्रपटासाठी तयार करण्यासाठी एक युक्ती केलं. याचा उल्लेख ‘श्रीदेवी द इटरनल स्क्रीन गॉडेस’ मध्ये करण्यात आला आहे. या दोन्ही सुपरस्टारनी ‘खुदा गवाह’ या चित्रपटापूर्वी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्रीला काय विनंती केली होती?
‘खुदा गवाह’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांनी जेव्हा बिग बींशी पटकथा घेऊन संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की या चित्रपटात श्रीदेवी त्यांच्यासोबत असू शकते. पण दोन चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर कदाचित असं होणार नाही असं बिग बींना वाटलं आणि असंच काहीतरी घडलं. श्रीदेवी या चित्रपटासाठी राजी झाल्या नाहीत. यामुळे अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीसाठी गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला.
अभिनेत्रीची अटही मान्य करण्यात आली.
अमिताभ बच्चन यांनी जे केले ते पाहून श्रीदेवीला धक्का बसला. पण तरीही त्यांनी चित्रपट करण्यासाठी एक अट घातली की त्या खुदा गवाहमध्ये मुलगी आणि आई दोघांचीही भूमिका करणार. निर्मात्यांनी श्रीदेवीची ही अट मान्य केली आणि त्या दुहेरी भूमिकेत दिसल्या. या चित्रपटात दक्षिणेकडील अभिनेता नागार्जुन देखील होता,त्याचा अभिनयही चाहत्यांना खूप आवडला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List