भारत-पाक युद्धाबाबत भविष्यवाणी खरी ठरली? हे भाकित करणारे स्वामी ‘यो’ आहेत तरी कोण?
ऑपरेशन सिंदूर’नंतर पहलगाममध्ये घोषणा. वंदे मातरम, भारत माता की जय, घोषणेनं पहलगाम दुमदुमला. पहलगाममध्ये कर्नाटक, बिहारमधील पर्यटक दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याचं समाधानही व्यक्त केलं आहे.
ऑपरेशन सिंदूरसारखं काहीतरी घडणार याची भविष्यवाणी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे सर्वत्र कौतुक केलं जात असून भारतात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
पण तुम्हाला माहितीये का की अशी चर्चा होता आहे या ऑपरेशन सिंदूरसारखं काहीतरी घडणार आहे याची कल्पना आधीच एका व्यक्तीला होती. ती व्यक्ती म्हणजे स्वामी ‘यो’. स्वामी यो यांनी या ऑपरेशनची आधीच भविष्यवाणी केली होती का? अशी चर्चा आता होताना दिसत आहे.ही भविष्यवाणी या स्वामींनी प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये केल्याचं म्हटलं जात आहे.
स्वामी ‘यो’ नक्की काय म्हणाले होते?
स्वामी ‘यो’ म्हणाले होते की मे महिन्यात असे काही ग्रह समीकरण तयार होत आहेत जे महाभारतासारख्या अनेक मोठ्या युद्धांच्या वेळी तयार झाले होते. रणवीर इलाहाबादिया यांच्या पॉडकास्टची ही मुलाखत व्हायरल होत आहे. पॉडकास्टमध्ये रणवीर स्वामींना विचारतो की,” जगात महायुद्ध होईल का?” त्यावर उत्तर देताना स्वामी ‘यो’ म्हणतात, “हो, मेमध्ये ग्रहांचे समीकरण असे जुळून येत आहेत. एकमेकांसोबत एकत्र यणारे हे 6 ग्रह महाभारत किंवा इतर महायुद्धांच्या काळात ग्रहांनी ज्या स्थितीत निर्माण झाले होते त्याच स्थितीत निर्माण होताना दिसत आहेत. या महायुद्धात, मी असे म्हणू शकतो की हा भारतासाठी सुवर्णकाळ आहे.” आता ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आता या युद्धाची भविष्यवाणी किंवा तशी कल्पना या स्वामींनी आधीच दिली होती अशी चर्चा आता होताना दिसत आहे.
स्वामी ‘यो’ कोण आहे?
स्वामी ‘यो’ यांचे पूर्ण नाव स्वामी योगेश्वरानंद गिरी आहे. स्वामी यो एक संन्यासी आहे. त्याचे स्वतःचे “स्वामी यो” नावाचे युट्यूब चॅनेल देखील आहे. जिथे तो आध्यात्मिक मार्गदर्शन, योग आणि ध्यानाशी संबंधित व्हिडिओ शेअर करत राहतो. स्वामी यो यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये असेही भाकीत केले आहे की भारत लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List