गोव्यात होणार सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, देश-विदेशांतून हिंदू उपस्थित राहणार
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 17 ते 19 मे या दरम्यान होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच 25 हजारांहून साधक, धर्मप्रेमी हिंदू या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहेत. या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिह्यांतून 2 हजार 500 हून अधिक साधक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List