पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद, पत्नी आहे गरोदर
पाकिस्तानने पूँछच्या सीमाभागात केलेल्या गोळीबारात लष्कराचे जवान लान्स नायक दिनेश कुमार शर्मा हे शहीद झाले आहेत.
दिनेश कुमार हे मुळचे हरयाणातील पलवल या गावचे आहेत. त्यांना दोन मुलं असून त्यांची पत्नी ही गरोदर आहे. उद्या दिनेश कुमार यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळ गावी नेले जाणार आहे.
ऑपरेशन सिंदूरने बिथरलेला पाकिस्तान सतत सीमा भागात गोळीबार करत आहे. पाकिस्तान आता नागरी वस्त्यांमध्ये गोळीबार करत असून आतापर्यंत या गोळीबारत 15 सामान्य नागरिकांनी जीव गमावला आहे. यात दोन लहान बालकांचा देखील समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List