हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला सलाम! पाकिस्तानचे हिंदुस्थानातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करा – उद्धव ठाकरे
हिंदुस्थानी सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम! अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. हिंदुस्थानी सैन्याने पाकडय़ांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला, असे सांगतानाच, पाकिस्तानचे हिंदुस्थानातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List