डॉ. दीपक हरके यांचा रशियात होणार ‘ग्लोबल लीडर’ अवार्डने सन्मान
जगभरात 143 देशात 8500 हून अधिक सेवा केंद्राच्या माध्यमातून निःशुल्क ध्यानधारणा शिकवणाऱया प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांचा जगभरात हिंदुस्थानच्या प्राचीन राजयोगाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल ग्लोबल लीडर अवार्डने सन्मान होणार आहे. रशियामध्ये दुसऱया महायुद्धात नाझी जर्मनीवर रशियाने मिळविलेल्या विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी 9 मे रोजी विजयदिन समारंभ साजरा केला जातो. यावेळी मॉस्कोमधील लाल चौकात लष्करी कवायती होतात. यानिमित्ताने सेंट पिट्सबर्ग मध्ये 11 मे रोजी आयोजित केलेल्या समिटमध्ये डॉ. दीपक हरके यांचा सन्मान केला जाणार आहे. यापूर्वीही ब्रह्मकुमार डॉ दीपक हरके यांना देशात व परदेशात विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List