Photo – लाडक्या बहीणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीचा मुंबईत मोर्चा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे येथे लाडक्या बहीणींची सरकारकडून होत असलेली फसवणूक, महिला अत्याचारात झालेली वाढ व महिला सुरक्षा, महिलांसाठी अपुऱ्या आरोग्यसुविधा आणि वाढती महागाई ह्यासारख्या समस्यांविरोधात जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिन ॲड साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेना उपनेत्या शितल देवरुखकर-शेठ, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभागसंघटक रंजना नेवाळकर, विभागसंघटक श्रद्धा जाधव तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List