हिंदुस्थानी महिलांचा विजय; दक्षिण आफ्रिकेला नमवून गाठली अंतिम फेरी
हिंदुस्थानी महिला संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत साडेसहाशे धावांची लयलूट झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 23 धावांनी पराभव केला. जेमिमा रॉड्रिग्जचे शतक, दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व अमनजोत कौरची भन्नाट गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. या विजयासह हिंदुस्थानने अंतिम फेरीत धडक दिली. आता 11 मे रोजी यजमान श्रीलंकाविरुद्ध त्यांचा अंतिम सामना रंगणार आहे.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 7 बाद 314 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून अॅनेरी डर्कसेन (81) व कर्णधार क्लो ट्रायॉन (67) यांनी अर्धशतके ठोकली. याचबरोबर ताझमिन बिट्स (26), मियाने स्मिथ (39) व नोंडुमिसो शांगसे (36) उपयुक्त फलंदाजी केली. हिंदुस्थानकडून अमनजोत काwरने 3, तर दीप्ती शर्माने 2 फलंदाज बाद केल्या. श्री चराणी व प्रतिका रावळ यांना 1-1 विकेट मिळाली.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 9 बाद 339 धावांचा डोंगर उभारला. यात जेमिमा रॉड्रिग्जने 101 चेंडूंत 123 धावा फटकाविताना एका षटकारासह 15 चेंडू सीमापार पाठविले. दीप्ती शर्मा (93) व स्मृती मानधना (51) यांनीही अर्धशतके ठोकून हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. दक्षिण आफ्रिकेकडून मसाबाटा क्लास, नॅडिन डी क्लार्क व नॉनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List