Rohit Sharma रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याने ही माहिती दिली.
”मला माझ्या सर्व चाहत्यांना सांगायचे आहे की आज मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. आपल्या देशासाठी सफेद रंगाच्या जर्सीत खेळणं व देशाचं प्रतिनिधित्व करणं हा बहुमान मला मिळाला. इतके वर्ष मला दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देशाचे नेतृत्व करत राहणार”, असे रोहित शर्माने शेअर केले आहे. रोहीत शर्माने कसोटी क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या टोपीचा फोटो शेअर करत त्यावर हा मजकूर लिहला आहे.
ROHIT SHARMA RETIRED FROM TEST CRICKET
pic.twitter.com/Yjtz8onaOr
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List