ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटातील ‘श्याम’ची म्हणजे छोटय़ा साने गुरुजींची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते, नाटय़ दिग्दर्शक माधव वझे (89) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा, अभिनेता-दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे.
माधव वझे यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1939 रोजी पुण्यात झाला. वाडिया का@लेजातून इंग्रजी प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. अभिनेता, दिग्दर्शक, नाटय़गुरू आणि नाटय़ समीक्षक अशी ओळख असलेल्या माधव वझे यांना राज्य नाटय़ स्पर्धेमध्ये उत्पृष्ट अभिनयासाठी रौप्यपदके मिळाली होती. भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. गोवा येथील कला अकादमीच्या नाटय़ विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केलेले वझे आंतरराष्ट्रीय नाटय़ समीक्षक संघाचे सभासद होते. नाटय़ संघाच्या देश-परदेशातील अधिवेशनामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते.परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते.
माधव वझे यांची भूमिका असलेले चित्रपट
डिअर जिंदगी (हिंदी चित्रपट), थ्री इडियट्स (हिंदी चित्रपट); श्यामची आई (बालनट) प्रायोगिक रंगभूमी ः तीन अंक (मूळ इंग्रजी ग्रंथाचे शांता गोखले यांनी केलेले संपादन; अनुवाद/संपादन – माधव वझे); रंगमुद्रा (अनेक नाटय़कर्मींची व्यक्तिचित्रणे); श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी (आठवणी); नंदनवन (मुलांसाठी), समांतर रंगभूमी ः पल्याड- अल्याड.
पुरस्कार ः ‘रंगमुद्रा’ या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार‘
प्रायोगिक रंगभूमी ः तीन अंक’ या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार, ‘श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी’ या पुस्तकाला पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार, ‘समांतर रंगभूमी ः पल्याड- अल्याड’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि नगर वाचन मंदिराचा पुरस्कार.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List