“मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायकाकडून राग व्यक्त

“मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायकाकडून राग व्यक्त

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “मला मुस्लीम असल्याची लाज वाटू लागली आहे”, असं ते या व्हिडीओत म्हणाले. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.

या व्हिडीओमध्ये सलीम म्हणाला, “पहलाममध्ये जे निर्दोष लोक मारले गेले, ते यासाठी मारले गेले कारण ते हिंदू होते, मुस्लीम नाही. मग अतिरेकी मुस्लीम आहेत का? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम ही शिकवण देत नाही. कुराण शरीफच्या सूरह अल-बकराहच्या आयत 256 मध्ये म्हटलं गेलंय की धर्मात कोणतीही बळजबरी नसते. हे कुराण शरीफमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salim Merchant (@salimmerchant)

“एक मुस्लीम असून मला हे सर्व पाहून लाज वाटतेय की निर्दोष हिंदू भावाबहिणींची निर्दयपणे हत्या करण्यात आली, कारण ते हिंदू आहेत. हे सर्व कधी संपणार? काश्मीरमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोक खूप चांगल्याप्रकारे राहत होते. आता त्यांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मी याबद्दलचं दु:ख आणि राग कसा व्यक्त करू हेच समजत नाहीये”, असं तो पुढे म्हणाला.

कॉमेडियन मुनव्वर फारुकीनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सलीम मर्चंट यांचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “मी मान झुकवून त्या निरपराध लोकांसाठी प्रार्थना करतो, ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत. देव त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो.” कलाक्षेत्रातील इतरही अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना पकडून कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आज गुरूवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहिती सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांना देतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे व्हॅकेशन आणि कामाशी संबंधित अपडेट्स शेअर...
अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर, नवरी म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझे कुंकू पाठवतेय
Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!
रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले
Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी
Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ सिंहांचा पाकला खणखणीत इशारा
Operation Sindoor ‘आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला