Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण

Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण

हवाई हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, यादृष्टीने रंगीत तालीम घेण्याचे सरकारचे निर्देश होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने मॉक ड्रीलची तयारी केली होती. (सर्व फोटो : भूषण पाटील)

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एअरफोर्सकडून संदेश आला आणि यंत्रणांनी केटीएचएमच्या बोट क्लब इमारतीकडे धाव घेतली. या ठिकाणी सायरन वाजला आणि नागरिकही सजग झाले.

काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलीस, एनसीसी, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत विविध संस्थांचे स्वयंसेवकही पोहोचले.

अग्निशमनच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढले, उपचारासाठी हलवले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कामाला लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

या संपूर्ण बचाव कार्यासाठी 30 मिनिटे इतका वेळ लागला. यातून विविध विभागांमधील समन्वयाचा, त्यात आवश्यक असलेल्या सुधारणांचा, तसेच आपत्कालीन प्रसंगाला जनता कशी तोंड देते याचा प्रशासनाला अंदाज आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;