हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता, चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था! उत्तराखंडमध्ये धरणांची सुरक्षा वाढवली

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता, चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था! उत्तराखंडमध्ये धरणांची सुरक्षा वाढवली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये आता कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून हिंदुस्थानने पाणी अडवण्याचे पहिले पाऊल उचलले. शिवाय ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, या आॅपरेशनमार्फत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले. म्हणूनच सध्याच्या घडीला हिंदुस्थान कठोर कारवाईसोबतच खबरदारी देखील घेताना दिसत आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्याच्या घडीला आता देशांतर्गत मोठे निर्णय घेतले जात आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाची शक्यता लक्षात घेता, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली.

मुख्यमंत्री धामी यांच्या या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यामध्ये चारधाम यात्रा, मोठ्या धरणांची सुरक्षा, राष्ट्रीय संस्था इत्यादींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत धामी यांनी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सीमांच्या परिस्थिती लक्षात घेता चारधाम यात्रेकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. उत्तराखंडमधील महत्त्वाच्या आस्थापना, धरणे आणि वीज प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यावरही त्यांनी भर दिला. मुख्यमंत्री धामी यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे चारधाम यात्रेत खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री धामी यांनी चारधाम यात्रेच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. उत्तराखंडमध्ये अनेक लहान आणि मोठी धरणे आहेत. टिहरी धरण त्यापैकी एक आहे. टिहरी धरण हे हिंदुस्थानातील सर्वात उंच धरण आहे. येथून देशातील अनेक राज्यांना वीजपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत त्याच्या सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच इतर धरणांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, उत्तराखंडमधील प्रमुख आस्थापने, धरणे आणि वीज प्रकल्पांवरही चर्चा झाली आणि त्यांनी प्रशासन, सरकारी विभाग आणि पोलिसांना उच्च सतर्क राहण्यास सांगितले. उत्तराखंडमधील चार धाम मार्ग, सीमावर्ती भागात सुरक्षा उपाययोजना सुरू उत्तराखंडमधील उत्तरकाशी आणि चमोली यांच्या सीमा चीनशी जोडल्या आहेत तर चंपावत आणि उधम सिंह यांच्या सीमा नेपाळशी आहेत. पिथोरागडच्या दोन्ही देशांशी सीमा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि राज्याच्या सर्व सीमावर्ती भागात मजबूत सुरक्षा आणि सीमावर्ती भागात कोणत्याही संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवण्याचे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ ‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
देशात एखादी मोठी घटना घडली की त्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चित्रपट बनवला जातो. पण त्याआधी त्या घटनेच्या नावावर शिक्कामोर्तब...
Operation Sindoor – पाकिस्तानातील अमेरिकन नागरिक आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सरकारने दिले देश सोडण्याचे निर्देश
…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट
Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या चिंधड्या
Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर
पंजाब सीमेवरून घुसखोरी करण्याचा डाव उधळला, बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घातल्या
Operation Sindoor हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त