Operation Sindoor रात्री 1.05 ते 1.30… 25 मिनिटांत खेळ खल्लास!

Operation Sindoor रात्री 1.05 ते 1.30… 25 मिनिटांत खेळ खल्लास!

पाकिस्तानवर मंगळवारी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी पहिला हवाई हल्ला करण्यात आला. त्यानंतर पुढच्या 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 तळ लक्ष्य करण्यात आले. या अड्डय़ांची कुंडलीच हिंदुस्थानी लष्कराने पत्रकार परिषदेतून जगासमोर मांडली.

– पीओकेतील मुझफ्फराबाद येथील लश्कर ए तोयबाच्या सवाई नाला प्रशिक्षण तळाला सर्वात आधी लक्ष्य करण्यात आले. सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते.

– मुझफ्फराबादच्या सैयदना बिलाल कॅम्पवर त्यानंतर क्षेपणास्त्र डागण्यात आली. येथे शस्त्रास्त्र, स्पह्टके आणि जंगलात कसे राहायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात होते.

– कोटलीतील गुरपूर कॅम्पमध्ये पूंछ येथे 2023 मध्ये भाविकांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांनी ट्रेनींग घेतले होते.
– भिंबरच्या बरनाला कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र कशी चालवायची याचे प्रशिक्षण दिले जात होते.
– कोटलीच्या अब्बास कॅम्पमध्ये तरुणांची माथी भडकावण्याचे काम करून त्यांना फिदायीन म्हणून तयार केले जायचे.
– सियालकोटच्या सरजल कॅम्पमध्ये मार्च 2025 मध्ये पोलीस जवानांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले.
– सियालकोटच्या हिजबुल महमूना जाया पॅम्पमध्ये पङ्गाणकोट हल्ल्याचा कट रचण्यात आला होता.

कसाबने ट्रेनिंग घेतले तो तळ जमीनदोस्त

मुरीदकेच्या मरकज तोयबा कॅम्पमध्ये अजमल कसाब आणि डेव्हिड कोलमन हेडलीला प्रशिक्षण देण्यात आले होते. लश्कर ए तोयबाचे हे मुख्यालय असून रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण दिले गेले. या संघटनेनेच पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दहशतवाद्यांचा हा तळ लाहोरपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. मस्जिद सुभान अल्लाह बहावलपूर हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षण दिले जायचे. येथे पाकिस्तानी सैन्यातील मोठे अधिकारीही येत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ ‘ऑपरेशन सिंदूर’चं टायटल मिळवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ
देशात एखादी मोठी घटना घडली की त्यावर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चित्रपट बनवला जातो. पण त्याआधी त्या घटनेच्या नावावर शिक्कामोर्तब...
Operation Sindoor – पाकिस्तानातील अमेरिकन नागरिक आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सरकारने दिले देश सोडण्याचे निर्देश
…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट
Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या चिंधड्या
Operation Sindoor- पाकिस्तानकडून लष्करी हल्ला झाल्यास त्याला कठोर उत्तर मिळेल- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर
पंजाब सीमेवरून घुसखोरी करण्याचा डाव उधळला, बीएसएफने पाकिस्तानी नागरिकाला गोळ्या घातल्या
Operation Sindoor हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त