Operation Sindoor मध्ये वापरण्यात आले ‘स्कॅल्प मिसाइल’, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये
जम्मू कश्मिरमधील 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून, हिंदुस्थान सरकारने त्या सर्व निष्पाप लोकांच्या जीवाचा बदला आॅपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. यादरम्यान सैन्याने राफेलमधील स्कॅल्प क्षेपणास्त्राने हाफिज सईदच्या लपण्याच्या ठिकाणावर हल्ला केला. पण या हल्ल्यात वापरलेले ‘स्कॅल्प मिसाइल’ काय आहे?

स्कॅल्प क्षेपणास्त्र म्हणजे काय?
SCALP क्षेपणास्त्र हे फ्रान्स आणि यूके यांनी बनवलेले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे पूर्ण नाव स्ट्राइक एअर-लाँचेड क्रूझ मिसाईल आहे. या क्षेपणास्त्राला यूकेमध्ये स्टॉर्म शॅडो आणि फ्रान्समध्ये SCALP-EG म्हणून ओळखले जाते. खरंतर ही दोन्ही क्षेपणास्त्रे एकसारखीच आहेत, फरक फक्त सॉफ्टवेअर आणि इंटरफेसमध्ये आहे. हे क्षेपणास्त्र सुरक्षित अंतरावरून अचूकतेने एअरबेस आणि बंकर सारख्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केले आहे.
पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड कृत्याचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील सुमारे 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात 30 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. या सर्जिकल स्ट्राईकनंतर उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक विमानतळ बंद करण्यात आले आहेत आणि आता पुढील आदेश येईपर्यंत उड्डाणे बंद राहतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List