खेळता खेळता तिन्ही भावंडांची कालव्यात उडी, एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश

खेळता खेळता तिन्ही भावंडांची कालव्यात उडी, एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश

पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील सहजपूर येथे तीन लहान भावंडे कालव्याशेजारी खेळत होती. खेळता खेळता तिघांनीही कालव्यात उडी मारली. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. यानंतर एका इसमाने धाव घेत दोघांना वाचवले तर एकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सहजपूर येथील माकरवस्ती कालव्याशेजारी मुजावर कुटुंब राहते. मुजावर कुटुंबातील 7, 5 आणि 3 वर्षे वयोगटातील मुलं कालव्याशेजारी खेळत होती. खेळता खेळता तिन्ही भावंडांनी कालव्यात उडी घेतली. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या ही बाब लक्षात आल्याने तिने आरडाओरडा केला. महिलेचा आवाज ऐकून निलेश खोमणे या इसमाने धाव घेत कालव्यातून दोघांना वाचवले. तर तीन वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेमुळे मुजावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खोमणे यांनी तात्काळ धाव घेतल्याने अन्य दोन चिमुकल्यांचा जीव वाचला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा
काँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र देत...
IPL 2025 कोलकात्याने सामना जिंकला, परागने मने!रियानचे शतक हुकल्याने चाहते हळहळले
बळीराजाच्या गळ्याभोवती कर्जाचा फास, तरीही महायुती सत्तेच्या धुंदीत मस्त;तीन महिन्यांत 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात फसवणुकीची तक्रार
रुद्राक्षाची माळ जपण्यावरून वाद धावत्या अवंतिका एक्प्रेसमध्ये ठाण्यातील महिलेवर मुस्लिम टोळक्याचा ब्लेडहल्ला
शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी, दीड वर्षानंतर मुहूर्त
हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले