डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय घेताय गर्भपाताच्या गोळ्या? वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता
काही महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भपाताच्या गोळ्या घेतात, परंतु हे केवळ आरोग्यासाठी धोकादायक ठरत नाही तर भविष्यातील गर्भधारणेवरही याचा परिणाम होऊ शकतो.
काही प्रकरणांमध्ये, गर्भपाताची गोळी गर्भधारणा पूर्णपणे संपवू शकत नाही, त्यामुळे शस्त्रक्रिया करून गर्भपात करावा लागतो. या समस्या धोका वाढवू शकतात आणि भविष्यातील गर्भधारणेवर देखील परिणाम करू शकतात.
गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर काही महिलांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज सारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List