चिमूटभर पावडरने तांब्या, चांदीची काळवंडलेली भांडी आता मिनिटांमध्ये होतील चकाचक! वाचा सविस्तर

चिमूटभर पावडरने तांब्या, चांदीची काळवंडलेली भांडी आता मिनिटांमध्ये होतील चकाचक! वाचा सविस्तर

आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये बेकिंग सोडा हा असतोच. बेकिंग सोड्याचे उपयोग अनेक पदार्थ बनवण्यासाठी होतो. बेकिंग सोडा प्रत्येकाच्या किचनमधील एक महत्त्वाची वस्तू. खासकरुन बेकरी आयटम बनवताना बेकिंग सोड्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो. बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आपल्या किचनमधील एक महत्त्वाची पावडर. खासकरून केक,पेस्ट्रीज, मफीन, ब्रेड बनवण्यासाठी या पावडरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. कोणतेही पीठ फुगण्यासाठी हा सोडा प्रत्येक घरोघरी वापरला जातो. प्रत्येक घराच्या किचनमधील हा सोडा अनेक गोष्टींसाठी उपयुक्त मानला जातो. जाणून घेऊया आपण बेकिंग सोडा पदार्थांव्यतिरिक्त कुठे आणि कसा वापरू शकतो.

बेकिंग सोड्याचे उपयोग

किचनमध्ये लागलेली छोटी मोठी आग विझवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

 

घरातील फ्रीज, ओवन, डिशवाॅशर स्वच्छ करण्यासाठी, बेकिंग सोडा हा खूप महत्त्वाचा आहे.

 

चांदीच्या भांड्यावर काळे डाग असल्यास, भांडी चमकवण्यासाठी बेकिंग सोडा हा सर्वोत्तम उपाय आहे.

 

करपलेली भांडी, टोप, कढई पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ करायची असल्यास, बेकिंग सोड्यामध्ये बुडवून ठेवल्यास भांडी पुन्हा स्वच्छ होतात.

फरशी चमकविण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर अनेक घरांमध्ये करतात.

 

बाथरुम स्वच्छ ठेवण्यासाठी बेकिंग सोडा हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

 

फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या यांच्यावरील घाण निघून जावी म्हणून बेकिंग सोडा धुण्यासाठी वापरला  जातो.

 

दातांसाठी बेकिंग सोडा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. बेकिंग सोडा दातावर घासल्यामुळे दात किडण्याची प्रक्रिया ही मंदावते. तसेच आपल्या हातांच्या नखांसाठीही बेकिंग सोडा हा खूप उपयुक्त मानला जातो.

 

छातीत जळजळ आणि अपचनावर बेकिंग सोडा हा रामबाण इलाज मानला जातो.

केस धुण्यासाठी सुद्धा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो.

शरीरावरील दुर्गंधीसाठी सुद्धा बेकिंग सोडा हा फार महत्त्वाचा मानला जातो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;