Caste Census – जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? काँग्रेसने केंद्राला घेरलं

Caste Census – जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? काँग्रेसने केंद्राला घेरलं

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. यातच जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याचबाबत बोलताना काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणतात की, “सरकार राहुल गांधींवर जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करण्याचा आरोप करत होते, मग आता सरकार जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करणार का?” ते म्हणाले की, “जे आजपर्यंत राहुल गांधींवर जातींच्या आधारावर लोकांना फूट पाडण्याचा आरोप करत होते, ते आता याला सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणतील.”

पवन खेरा म्हणाले की, “ही चौथी-पाचवी वेळ आहे जेव्हा त्यांनी (सरकारने) आधी राहुल गांधींच्या सूचनांचा विरोध केला आणि नंतर त्यावर सहमती दर्शवली. या लोकांना सरकार कसे चालवायचे हे माहित नाही.” पवन खेरा म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे जातनिहाय जनगणना आणि यासोबतच आणखी अनेक महत्वाची पावले उचलायची आहेत आणि उचलली पाहिजेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;