Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो

Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो

उन्हाळा सुरू झाला की आरोग्यापासून ते त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. त्याचबरोबर केसांच्या समस्या देखील डोकं वर काढतात. त्यात उन्हाळा हा ऋतू कुरळ्या केसांसाठी खूप कठीण असतो. या दिवसात कुरळ्या केसांची काळजी घेणे थोडे कठीण काम असते. उन्हाळ्यात हे आव्हान आणखी वाढते. तीव्र सुर्यप्रकाश घाम आणि धूळ केसांना निर्जीव बनवू शकतात. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यासाठी योग्य असा खास केसांची काळजी घेण्याचा दिनक्रम अवलंबणे महत्वाचे आहे.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की ज्यांचे केस कुरळे आहेत त्यांनी नियमितपणे केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकाल. यामुळे तुमचे केस चमकदार आणि सुंदर होतील.

हलका शाम्पू वापरा

कुरळ्या केसांना सर्वात जास्त ओलावा लागतो, परंतु उन्हाळ्यात घाम आणि धूळ यामुळे केस वारंवार धुवावे लागतात. अशा वेळेस यावर मात करण्यासाठी तुम्ही सल्फेट-मुक्त, सौम्य आणि हायड्रेटिंग शैम्पू वापरा. यामुळे तुमचे स्कॅल्प स्वच्छ राहील आणि केसांमधून आवश्यक ओलावा जाणार नाही.

खोल कंडिशनिंग

उन्हाळ्यात केस खूप लवकर कोरडे आणि कुरळे होतात. तर यावेळेस डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट खूप महत्वाचे आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी खोल कंडिशनर किंवा हेअर मास्क लावा. हे तुमच्या केसांना आतून पोषण देईल आणि त्यांना मऊ, चमकदार आणि व्यवस्थित ठेवेल.

केसांचा सीरम

कुरळे केसांचे स्टाईल करणे सोपे नाही. केस धुतल्यानंतर लीव्ह-इन कंडिशनर किंवा हलका केसांचा सीरम लावा. यामुळे केस ओलसर राहतील. कोरफड, नारळ तेल किंवा शिया बटर सारखे घटक असलेला सीरम शोधण्याचा प्रयत्न करा.

उष्णता उपकरणांपासून दूर रहा

उन्हाळ्यात केसांवर सूर्यप्रकाश आणि गरम हवेचा आधीच परिणाम होतो. अशा परिस्थितीत, स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो ड्रायरचा जास्त वापर केसांना आणखी नुकसान पोहोचवू शकतो. तुमचे केस नैसर्गिकरित्या सुकू द्या आणि आवश्यक असल्यास, UV प्रोटेक्टेड स्प्रे लावल्यानंतरच हिट टूल्स वापरा.

याशिवाय, जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमचे केस स्कार्फ, टोपी किंवा छत्रीने झाकून ठेवा. तसेच, केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षित ठेवण्यासाठी हेअर सनस्क्रीन किंवा यूव्ही प्रोटेक्टंट स्प्रे वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी 400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी
मुंबईतील अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 400 शिक्षकांना मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शाळांमध्ये सामावून घ्या. अन्यथा...
दादर येथे आज एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ सोहळा, शिवसेना आणि जाणीव ट्रस्टच्या वतीने आयोजन
बलात्कारातील आरोपीच्या खात्यात शंभर कोटींचे व्यवहार!
Ratnagiri News – पाय मारला अन् डांबर निघालं; गुडघे गावाच्या हद्दीत सुरू असलेलं रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थ आक्रमक
उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ