लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने दिली गुड न्यूज; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी ते एका नवीन कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत एक खास गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांची ही गुड न्यूज जाणून चाहत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हा-जहीर या जोडीने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज
सोनाक्षी सिन्हा-जहीर या जोडीने दिलेली गुडन्यूज म्हणजे त्यांनी खरेदी केलेली एक आलिशान BMW कार. या जोडीने या कारसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ज्यामध्ये ते त्यांच्या नवीन कारसह खूप आनंदी दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीरने फोटो शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
फोटोत झहीर इक्बाल कारच्या ड्रायव्हिंग सीटजवळ उभा असल्याचे दिसत आहे, तर सोनाक्षी सिन्हा कारच्या बोनेटजवळ हसत आणि पोज देताना दिसत आहे. हा क्षण दोघांसाठीही खास आहे कारण त्यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी ही आलिशान कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर कारचा फोटो शेअर करताना झहीर इक्बालने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “संपूर्ण प्रोसेस अत्यंत सोपी केल्याबद्दल @bmwinfinitycars आणि @bmwindia_official यांचे खूप खूप आभार. कार निवडण्यापासून ते घरी नेण्यापर्यंत, सर्वकाही छान होते! शेवटी माझी नवीन गाडी चालवायला मला खूप आनंद होत आहे.” त्यांच्या या यशाबद्दल चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
लवकरच हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे
सोनाक्षी आणि झहीर यांचे लग्न गेल्या वर्षी 23 जून रोजी काहीच लोकांच्या उपस्थितीत पार पडले. आता लवकरच हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत, ही नवीन कार त्या दोघांसाठी एक खास भेट ठरू शकते.
सोनाक्षी सिन्हाला अलीकडेच ‘दहाड’ या वेब सिरीज आणि ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात काम केल्याबद्दल प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली होती, तर झहीर इक्बाल देखील त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List