भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात अभिनेत्री द्या…, पाकिस्तानने अजब मागणी केली तेव्हा…

भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात अभिनेत्री द्या…, पाकिस्तानने अजब मागणी केली तेव्हा…

India – Pakistan : सध्या सर्वत्र भारत – पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावरण आहे. भारताकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे. भारत – पाकिस्तान तणाव सुरु असताना असा किस्सा समोर आला आहे ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी सौनिकांनी बॉलिवूडच्या अभिनेत्रींची डिमांड केली होती, तेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. ऑपरेशन सिंदूर एअर स्ट्राईक दरम्यान, पाकिस्तान आणि बॉलिवूडशी संबंधित एक घटना घडली होती. सध्या ती घटना तुफान चर्चेत आली आहे. जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल…

संबंधित किस्सा 1999 मधील भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यानचा आहे. पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सैनिकांच्या मृतदेहांच्या बदल्यात बॉलिवूड अभिनेत्रींची डिमांड केली होती. ज्यानंतर भारतीय सेने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. पाकिस्तानने ज्या अभिनेत्रींची मागणी केली होती, त्या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन होत्या.

या घटनेचा उल्लेख शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी एका मुलाखतीत केलेला. पाकिस्तानी सैनिकांसोबत भारतीय सैनिक युद्ध करत होते आणि त्यामध्ये अनेक भारतीय जवानांचे मृतदेह पारिस्तानच्या हद्दीत होते. गोळीबार सुरु असल्यामुळे भारतीय सैनिकांचे मृतदेह आणता आले नाही.

पाकिस्तानकडून गोळीबार सुरु होता आणि पाकिस्तानला भारत देखील प्रत्युत्तर देत होतं. अशात एका पाकिस्तानी सैनिकाचा आवाज आवाज आला. ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जाऊ…’ त्यावेळी बटालियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांनी त्यांच्या एके 47 मधून गोळीबार केला आणि पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाले, “माधुरीकडून प्रेमाने”. त्या काळात या घटनेची खूप चर्चा झाली.

एवढंच नाही तर, अभिनेत्री रवीना टंडन हिची डिमांड देखील पाकिस्तानी सैनिकांनी केली होती. युद्धात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले. म्हणून भारतीय सैनिकांनी इतर सैनिकांच्या मृतदेहांची मागणी केली. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी रवीना टंडनची मागणी केली होती.

एवढंच नाही तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देखील एका मुलाखतीत कबुल केलं होतं की, त्यांना अभिनेत्री रवीना टंडन प्रचंड आवडते. शिवाय ते अभिनेत्रीचे मोठे चाहते देखील आहेत. जेव्हा भारतीय सैनिकांना कळलं तेव्हा त्यांनी शरीफ यांनी एका मिसाईल पाठवली आणि त्यावर लिहिलं होतं ‘रवीना टंडन हिच्याकडून नवाज शरीफ यांच्यासाठी…’, तो फोटो आजही व्हायरल होत असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका नाना पाटेकर ते अच्युत पोतदार…, फक्त सिनेमांमध्ये नाही तर, सैन्यात देखील ‘या’ अभिनेत्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
22 एप्रिल ही अशी तारीख आहे की या दिवसाने संपूर्ण भारताला हादरवलं. या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला,...
मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन
‘ओ दीदी…अब काम मांगने मत आना…’ भारताविरोधात बोलणाऱ्या माहिरा खानवर भडकला अभिनेता
पाकिस्तानसाठी मृत्यूची घंटा झालेली रवीना टंडन, माजी पंतप्रधानांची उडालेली झोप, कारण समोर
पंजाब आणि जम्मूमधील अनेक रेल्वे रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाचा निर्णय
…पण कोणीही दहशतवाद पोसू नये, ‘तारक मेहता…’ फेम बबिताजींनी पाकला सुनावलं; हिंदुस्थानच्या जवानांना केला सॅल्यूट
India Pakistan War – बातम्या दाखवताना सायरनचा आवाज वापरू नका, केंद्रीय गृहमंत्रालयाचे न्यूज चॅनेल्सना सूचना