अवकाळीने जव्हारमध्ये ‘ब्लॅकआऊट’; महावितरण विभागाचे पहिल्याच पावसात धिंडवडे
तीन दिवसांपासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जव्हारमध्ये 48 तासांचा ‘ब्लॅकआऊट’ पसरला आहे. या भागातील चालतवड, देहेरे देवगाव, खंबाळा, तलासरी, दाभलोन, कायरी दाभेरी, बोपदरी, वावर-वांगणीसह अनेक गावात गेल्या 48 तासांहून अधिक वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भागातील नागरिक अंधारात दिवस काढत असून पहिल्याच पावसात महावितरण विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.
मुंबई, ठाण्यासह ग्रामीण भागात गेले दोन दिवस कोसळलेल्या तुफानी अवकाळी पावसाने जव्हार तालुक्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. अवकाळीच्या तडाख्याने विजेचे खांब तसेच केबल तुटले आहेत. दरम्यान, दुर्गम भागात वीज कंपनीचे कर्मचारी पोहोचले नसल्याने विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. अनेक गावात पोल व तारा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्या असून दोन दिवस उलटून गेल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
देयके भरण्यास उशीर झाल्यास कारवाई
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महावितरणकडून पावसाळापूर्व तयारी वेळेवर करण्यात आली नाही. जव्हार तालुक्यात डोंगराळ, जंगल व नद्यांनी भरलेला भूभाग असल्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे नेहमीचेच झाले आहे. वीज नसताना महावितरणकडून येणारी देयके वेळेवर भरण्यास थोडा उशीर झाला तर तत्काळ वीज तोडली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List